अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील दुसऱ्या गटातर्फे देखील ५ जणांवर विनयभंगाचा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भिकुबाई लक्ष्मण पाटील यांनी फिर्याद दिली की भूषण पाटील याने टाकलेल्या मुरुमामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत होता त्याबाबत बोलायला गेलो असता भूषण पाटील व त्याची पत्नी योगिता पाटील यांनी शिवीगाळ केली नंतर भूषण , योगिता , ज्ञानेश्वर पाटील ,संतोष विश्वास पाटील , यमाई हातात लोखंडी सळी काठ्या घेऊन घरात घुसून मारहाण केली पती , जेठ ,दिर याना पण मारहाण करून हात धरून विनयभंग केला म्हणून महिलेच्या फिर्यादीवरून वरील चारही आणि सुमनाबाई उत्तम पाटील यांच्याविरुद्ध भादवी १४३, १४७ , १४८ , १४९ , ४५२ ,३५४ ,३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे दंगल मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुभाष महाजन करीत आहेत.