अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी धुळे येथील निष्पन्न झाला असून पोस्को कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे
मंगरूळ येथील अल्पवयीन तरुणीला एका अज्ञात इसमाने पळवून नेले होते पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर , हेडकॉन्स्टेबल सुभाष महाजन , पोलीस भूषण पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून धुळे येथील शाहरुख जावेद बेग वय २२ रा मोतीनगर धुळे याने त्या तरुणीला पळवून नेले होते आणि घरात लपवून ठेवले होते त्यानुसार आरोपी व पीडित तरुणी दोघांना धुळे येथून ताब्यात घेतले मुलीच्या जबाबवरून शाहरुख विरुद्ध अपहरण व पोस्को कायद्यांव्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे तर मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे