अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील प्र.डांगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत सण २०१३ ते २०१८ या कालावधीत तत्कालीन संचालक, सचिव, चेअरमन, कर्मचारी सह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक व क्षेत्रीय अधिकारी यांनी संगनमताने मिळून त्यांचे कडे असलेल्या पदाचा दुरुपयोग करून बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे म्हणून वापरून त्यांचे कर्तव्य व जबाबदारी व्यवस्थित रित्या पार न पाडता त्या सर्वांनी संस्थेचा निधीची अफरातफर करून एकूण रक्कम ५४ लाख ६६ हजार ४६० रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा संगनमताने अपहार व गैरव्यवहार करून शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था व सभासद शेतकऱ्यांचा विश्वास घात करून फसवणूक केली अशी फिर्याद मारवड पोलीस ठाण्यात काल २३ रोजी दुपारी जळगांव येथील सहकारी संस्थेचे ( पणन ) वर्ग एकचे विशेष लेखा परीक्षक अनिल गंगाराम पाटील वय ४८ राहणार जळगांव यांनी पोलिसांत दिल्यावरून संस्थेचे तत्कालीन सचिव १) मोहनकुमार गंगाधर पवार राहणार पातोंडा, चेअरमन २)अनिल शिसोदे राहणार प्रगणे डांगरी,३)रामकृष्ण पाटील राहणार रात्री,४)संगीताबाई शिसोदे राहणार प्रगणे डांगरी, ५)अंतरावर शिसोदे राहणार प्रगणे डांगरी, ६)गुलाबराव शिसोदे राहणार प्रगणे डांगरी, ७)उदय शिसोदे राहणार प्रगणे डांगरी,८)बाळासाहेब शिसोदे राहणार प्रगणे डांगरी,९)वसंतराव व्ही पाटील, राहणार प्रगणे डांगरी, १०)शालीक पाटील राहणार प्रगणे डांगरी, १२) नामदेव वानखेडे राहणार कलाली, १३) रमेश बोरसे( मयत) राहणार रात्री, १४) संतोष भोई( मयत) राहणार प्रगणे डांगरी, १५) अशोक पाटील राहणार रात्री,१६) देवकाबाई भोई राहणार प्रगणे डांगरी, १७) उदय पाटील राहणार रात्री, १८) श्रावण भोई राहणार प्रगणे डांगरी, १९) छगन पाटील राहणार प्रगणे डांगरी, २०) अरुण शिसोदे राहणार प्रगणे डांगरी, २१) भाईदास पाटील राहणार प्रगणे डांगरी,२२) प्रशांत कुमावत राहणार प्रगणे डांगरी, २३) मिनाबाई पाटील राहणार प्रगणे डांगरी, २४) ज्ञानेश्वर पाटील राहणार प्रगणे डांगरी,२५) निर्मलाबाई चौतमन राहणार प्रगणे डांगरी,२६) कमलाकर शिसोदे राहणार प्रगणे डांगरी,२७) दिनकर देसले राहणार अमळनेर,२८) गुलाबराव पाटील राहणार अमळनेर, २९) जयराम पाटील राहणार अमळनेर ३०) किशोर पवार राहणार अमळनेर या सर्व ३० आरोपीं विरोधात संगनमताने गैरव्यवहार करून अपहार केल्या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात भाग ५, गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०१९ नुसार भा. द. वी. कलम ४२०,४०८,४०९, ४६५,४६८,४७१ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला हे करीत आहेत, सहकार क्षेत्रातील मोठ्या रकमेचा अपहार व गैरव्यवहार प्रकरणी एकूण ३० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून मोठ्या रकमेचा अपहार व गैरव्यवहार प्रकरणी अद्याप कोणाला ही अटक करण्यात आलेली नाही.
विकास सोसायटीत अपहार प्रकरणी तत्कालीन सचिव याने केलेला गैरव्यवहार माझ्या लक्षात आल्यावर याबाबत सर्व प्रथम मी तक्रार केली होती व चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली होती सर्व गैरव्यवहारास सचिव व जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक, क्षेत्रीय अधिकारी जबाबदार आहेत मात्र आमच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने आता चौकशी अंती सत्य समोर येईल – अनिल शिसोदे, तत्कालीन चेअरमन विकास सोसायटी – प्र.डांगरी