अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषदेच्या सेवाविषयक बाबींमध्ये व आर्थिक व अति महत्वाच्या दस्तऐवजांवर अनधिकृत पणे काही कर्मचारी सह्या करीत असल्याची तक्रार उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनकडे केली होती. याचा चांगलाच खरपूस समाचार खबरीलाल आणि एका दैनिकाने घेतला होता. याची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन करनिर्धारण पदावर कार्यरत भडगाव नगरपरिषदेचे नागेश आंबादास ‘खोडवे’ यांच्याकडे सोपलेला अतिरिक्त कार्यभार काढून त्यांना चांगलेच ‘आडवे’ केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन अधिकारी उत्कर्ष गुटे मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांनकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, अमळनेर नगरपरिषदेत करनिर्धारण व प्रशासकीय सेवेतील कर्मचारी नागेश आंबादास खोडवे हे नगरलेखापाल या आर्थिक व महत्वाच्या पदावर सह्या करीत आहेत. महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार आणि महाराष्ट्र शासन राजपत्र ३० जानेवारी २०१८ अनुसार बेकायदेशीर असून याबाबत चौकशी करावी अशी मागणी गायकवाड यांनी जिल्हाधिकारीनकडे केली होती.
याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी उत्कर्ष गुटे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, नागेश आंबादास खोडवे कर निर्धारण प्रशासकीय सेवा. श्रेणी-क नगरपरिषद भडगाव यांच्याकडे अमळनेर नगरपरिषदेतील कर निर्धारक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात होता.तथापि नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई यांच्याकडील आदेशान्वये अमळनेर नगरपरिषदेसाठी जगदीश दौलत पदमर ( कर निर्धारण प्रशासकीय सेवा श्रेणी-क), संदीप देवजी गायकवाड ( कर निर्धारण प्रशासकीय सेवा श्रेणी-अ), नेहा हरीषचंद्र पाटील ( कर निर्धारण प्रशासकीय सेवा श्रेणी-ब) हे कायमस्वरूपी कर निर्धारक आपल्या नगरपालिकेस देण्यात आले असल्याने, खोडवे यांच्याकडे सोपवण्यात आलेला अमळनेर नगरपरिषदेतील कर निर्धारण प्रशासकीय सेवा पदाचा अतिरिक्त कार्यभार या पत्रान्वये काढून घेण्यात येत आहे. खोडवे यांनी आजपासून आपल्या मूळपदावर पूर्ण वेळ काम करावे, अशा सूचना केल्या आहेत.
खोडवेंचा पदभार काढला मग यांचे काय..? तसेच उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी सबओर्शियर आस्थापनेवर नियुक्त एस. टी. पाटील हे नगरअभियंता आस्थापनेच्या अभियंता पदावर बांधकाम परवानगी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, ना हरकत दाखलयांवर सह्या करीत आहेत तसेच लिपिक पदावरील नितीन खैरनार हे अग्निशमन अंतर्गत नगर अभियंता या पदावर कार्यरत असून सह्या देखील करीत आहेत, अशीही तक्रार केली होती. त्यामुळे खोडवेंचा पदाभार काढला मग पाटील, खैरनार यांच्या पदभाराचे काय करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.