
अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील खेळी व्यवहारदळे येथे कार्यक्रमाचे आयोजक पोलिस पाटील लखिचंद पाटील व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकांना झाडांचे महत्व व त्यापासून होनारे फायदे शेतकरी हिताचे प्रश्न आपल्या मार्गदर्शनातून जि.प.मराठी शाळा व सप्तश्रृंगी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अमळनेरचे तहसिलदार सौ ज्योती देवरे,अमळनेरचे नुतन पोलिस निरीक्षक श्री.अंबादास मोरे,स.पो.नि.प्रकाश सदगीर,तालुका कृषी अधिकारी भरत वारे ,जळगाव जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, धरणगाव तालुका अध्यक्ष किशोर भदाने जिल्हा सचिव उल्हास लांडगे, अमळनेर तालुका अध्यक्ष भानुदास पाटील खेळी व्यवहारदळे गावाचे सरपंच सौ.विजुबाई वाघ,वि का सो चेअरमन निंबा नाना,त.मु अध्यक्ष पांडुरंग पाटील, ग्रामसेवक अनिता पाटील,कृषिसेवक पुनम पाटील, तलाठी संतोष कोळी यांच्या सह गावातील ग्रामस्थासोबत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी खेळी व्यवहारदळे गावाचे पोलिस पाटील लखिचंद पाटील यांनी ४०. झाडांचे संगोपन सह संपुर्ण जबाबदारी घेतली,कार्यक्रम यशस्वीते साठी गावातील ग्रामस्थ, पोलिस पाटील संघटनेने सहकार्य केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भगवान आबा आणि आभार प्रविण पाटील यांनी मानले.