कळमसरे ता.अमळनेर- येथील शेतशिवारात गेल्या दोन दिवसात पाच जणांवर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने त्यांना उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुगणालयात हलविले होते.
आज 22 रोजी कळमसरे शेत शिवारात डांगरी रस्त्यालगत असलेल्या शेतातील काम करणाऱ्या शेतमजुरांसह शेतमालकाला दुपारी बारा ते अडीच वाजे दरम्यान तीन जणांना चावा घेतला . तर ता.23 रोजी पुन्हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ठराविक अंतरात चंद्रकला संजीव महाजन व किरण श्रीकृष्ण महाजन यांना वेगवेगळ्या शेतात चावा घेतला होता. त्यांना ताबडतोब धुळे जिल्हा रुग्णालयात हलविले होते.यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरल्याने वनविभागाला शिवाजी राजपूत व प्रा.हिरालाल पाटील यांनीयाबाबत कळविले होते. यापाश्वभूमीवर वन विभागाचे वनपाल वाय यु पाटील यांनी आज ता.24 रोजी आठ जणांच्या पथकासह सकाळी दाखल झाले असता.पाडळसरे नव्या गावात रात्रीच्या वेळेस कुत्र्यानी कोल्ह्यावर हल्ला करीत मारुन टाकलेले दिसून आले.
घटनास्थळी जाऊन वनपाल वाय यु पाटील , वनरक्षक दीपक पाटील,वनरक्षक योगेश साळुंखे व वनमजुर यांनी पंचनामा केला.यावेळी या हिंस्र प्राण्यांविषयी कोल्हाच असल्याचे सांगून तो पिसाळलेला असल्याने चावा घेतल्याचे सांगण्यात आले.यावेळी भागवत पाटील, विश्वास कोळी,जितेंद्र राजपूत, शिवाजी राजपूत पोलीस पाटील उमाकांत पाटील, वसंतराव पाटील, प्रा.हिरालाल पाटील, कृषी सहायक सुभाष पाटील,रविंद्र पाटील,संजय चौधरी, संजीव महाजन, निलेश राजपूत,दिनेश चौधरी ,
आदी उपस्थित होते यानंतर कळमसरे येथील भरत महाजन यांच्या शेतातील बांधावर पशुवैद्यकीय अधिकारी एस एम इंगोले यांनी शव विच्छेदन केले .यानंतर कोल्हावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करीत वन्यप्राण्यांविषयी माहितीपत्रके वाटीत माहिती देण्यात आली असून ग्रामस्थानी याबाबत वन्य प्राण्यांविषयी ओळख देत शांततेचे आवाहन केले.