खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने खोलीकरण झालेले नाले यंदाच्या पावसाळ्यात झाले प्रवाहीत

सिमेंट बंधारेही होताहेत हाऊसफुल्ल,अनेक गावे होणार दुष्काळमुक्त

अमळनेर(प्रतिनिधी)संपूर्ण अमळनेर मतदार संघात गेल्या दोन वर्षात आ.शिरीष चौधरी च्या प्रयत्नातून व हिरा उद्योग समूहाच्या स्वखर्चातून मोठ्या प्रमाणात नाला खोलीकरणं, आणि सिमेंट बंधाऱ्याचे काम झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात हे नाले आणि बंधारे पाण्याने खळखळले असून यामुळे मतदार संघातील अनेक गावे दुष्काळ मुक्त होण्याचे संकेत मिळत आहेत.
अमळनेर तालुक्यातील निम व तांदळी शेत शिवारातील पथराड नाल्याचे आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातून खोलीकरण करण्यात आले होते,हा नालाही पावसाच्या पाण्याने भरून प्रवाहित झाला असून यामुळे मोठ्या प्रमाणावर या परिसरातील शेती सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे,आ चौधरी यानीं सुरवातीपासून शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेस प्राधान्य देऊन नदी व नाला खोलीकरण तसेच शेततळे,सिमेंट बांध आदी जलसंधारणाच्या कामावर अधिक भर दिला,जेथे शासन कमी तेथे आम्ही ही संकल्पना सुरवातीसून असल्याने केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता हिरा उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्द करून अनेक गावांत खोलीकरणाची कामे केली,अखेर जलयुक्त शिवार योजनेस हिरा उद्योग समूहाची खंबीर साथ मिळाल्याने व काही गावात लोकसहभाग देखील मिळाल्याने गेल्या दोन वर्षांपासून अमळनेर मतदार संघ जलयुक्त शिवार मध्ये अव्वल ठरत असून यंदा हे नाले व बांध जलमय होत असल्याने आ शिरीष चौधरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button