अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत सामाजिक न्याय दिवस राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. ‘सामाजिक समतेचे तत्व आपल्या कृतिशील निर्णयातून व्यवस्थेत उतरविणारे शाहू महाराज युगपुरुष होते!’असे प्रतिपादन याप्रसंगी मुख्यध्यापक रणजित शिंदे यांनी केले.
शाहू महाराजांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.उपस्थित शिक्षक आंनदा पाटील, संगिता पाटील, गीतांजली पाटील, धर्मा धनगर यांनीही पूजन केले. प्रस्ताविक परशुराम गांगुर्डे यांनी तर आभार प्रदर्शन ऋषिकेश महाळपूरकर यांनी मानले.याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे शाहू महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.