पूज्य सानेगुरुजी पतपेढीचे अध्यक्ष नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याने नुतन अध्यक्ष निवडीची मागणी…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील पूज्य सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पतपेढीचे अध्यक्ष नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याने अध्यक्षची निवड त्वरित घेण्यात यावी अशी मागणी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पू.सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पतपेढी ही फक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आहे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र भगवंतराव पवार हे जानवे येथील शाळेतून सेवानिवृत्त झाले असून आज रोजी ते शिक्षक नसल्याने त्यांना या पतपेढीच्या अध्यक्षपदावर राहण्याचा अधिकार नाही संस्थेच्या घटनेत अथवा उपविधी मध्ये तसा कुठलाही उल्लेख नाही त्यामुळे सेवेत नसलेली व्यक्ती अध्यक्ष पदावर राहिल्यास गैरव्यवहार होऊन त्यावर नियंत्रण राहू शकत नाही म्हणून अध्यक्ष पदाची निवडणूक त्वरित जाहीर करावी अशा आशयाची मागणी जितेंद्र ठाकूर यांनी सहाय्यक निबंधक यांच्या मार्फत जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

सानेगुरुजी पतपेढीचे सर्व कागदपत्रे तपासले असता सेवा निवृत्त कर्मचारीला पतपेढी चे संचालक म्हणून राहता येते असा कुठेही नियमात उल्लेख नाही त्यामुळे जिल्हा उपनिबंधकाना अहवाल पाठवण्यात आला आहे . जी.एच.पाटील , सहाय्यक निबंधक , अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *