अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे अस्मिता सोशल ग्रुपतर्फे गायकवाड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
अस्मिता सोशल ग्रुपच्या सदस्या सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विमलताई मैराळे यानी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो हा दृष्टीकोन ठेऊन आपल्या कमाईचा काही हिस्सा समाजकार्य व शैक्षणिक कार्यासाठी खर्ची व्हावा हा डाँ.बाबासाहेबांचा विचार घेऊन प्रेरित होऊन असे उपक्रम राबवित आहेत.
गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणाऱ्या विमलताई मैराळे यांनी आपल्या भाषणात विदयार्थांना शाळेची आवड निर्माण व्हावी, त्यांनी भविष्यात चांगले अधिकारी बनावेत असे मत व्यक्त केले. तसेच अशा उपक्रमात इतरांनी देखील भाग घेत सामाजिक बांधिलकी जपावी, अशा कार्याला गती देण्यासाठी प्रवृत्त व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.माधुरी पाटील होत्या. तर याप्रसंगी विद्या हजारे, प्रतिभा कुलकर्णी, अनुपमा जैन जसमिन भरूचा, हेमा पाटील आदि भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.