पाण्याअभावी बहूतांश शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी शिजलीच नाही.

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात सर्वत्र पाणीटंचाईची पहिली झळ विद्यार्थ्यांना पोहचली असून पाण्याअभावी बहूतांश शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी शिजलीच नाही. पाणीच नसल्याने तूर्त आता हा आहार बंद करण्यात आल्याचा निर्णय सानेगूरूजी शाळा संस्थाचालकांनी घेतल्याची माहीती संस्थेचे सचिव संदिप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली पालिका अथवा तहसील प्रशासनाने रोज आहारासाठी लागणारे पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे; तरच आम्ही नियमित पोषण आहार देऊ शकतो, असे श्री घोरपडे यांनी म्हटले आहे .
शाळेत सुमारे २३०० विद्यार्थी आहेत. त्यांच्या पोषण आहारासाठी रोज एक हजार लिटर पाणी लागते. अडचणींवर मात करुन हा पुरवठा सुरळीत ठेवला होता. शाळा परिसरातील विहीर, कुपनलीकाही आटल्याने टँकरने पाणी आणत होतो. मात्र, आज आम्हास पाणीटंचाईने दूप्पट पैसे मोजूनही पाण्याचे टँकर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामूळे विद्यार्थ्यांना आहार देऊ शकलो नाही. तरीही आम्ही पूरक आहार म्हणून बिस्कीट विद्यार्थ्यांना दिले आहेत. आम्ही आता नगराध्यक्ष, तहसीलदार यांना भेटून पाणी मिळण्याबाबत मागणी केली आहे शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन मागवणार आहोत, असेही श्री. घोरपडे यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, अनिता बोरसे, मेघा देवरे, गुणवंतराव पाटील, श्रीप्रकाश निकम आदी उपस्थित होते हिच अवस्था शहरातील ईतर शाळेंची देखील आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आता तरी जल, जंगल, जमिन,जनावर, वाचवा वृक्ष लागवड करा असा संदेश आम्ही विद्यार्थ्यांना देत अाहोत.