नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसच्या प्लँटला मुख्याधिकारींनी ठोकले टाळे ; सत्ताधारी गटाचा पाणी घोटाळा विरोधकांनी ऊघडकीस आणला प्रकार

अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या मूख्य जलवाहिनीवरून पाणी जोडणी करून पालीकेची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसच्या प्लँटला मूख्याधिकारींनी सिल लावल्याने सत्ताधारी गटाचा पाणी घोटाळा विरोधकांनी आज ऊघडकीस आणला आहे सदर एजन्सीवर गून्हा दाखल करण्याचे आदेश अभियंता हर्षल सोनवणे यांना दिला आहे नगरपालीके तर्फे शुद्धपेय जल पुरवठा करण्याची( आर अो) प्लांट चे या एजन्सीला काम दि १० जानेवारी २०१९ पासून देण्यात आले होते. करारनाम्यानूसार संबंधित ठेकेदाराला ३०० स्के.फूट जागा व सिंधी कॉलनीतील विंधनविहिरीवरून पालीकेने पाण्याची उपलब्धता करून दिली होती सदर पाणी थंड करून नागरीकांन नाममात्र म्हणजेच १ रूपये लीटरने द्यायचे होते मात्र सदर ठेकेदाराने सरळ मूख्य पाईपलाईनवरून जोडणी करून अवैधरित्या कनेक्शन घेतल्याचे पहाणीत आज नगरसेवकांनी लक्षात आणून दिल्याने मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी या प्लॉंटला सिल लावले आहे शहरात गेल्या ६ महिन्यापासून पालीका प्रशासन व प्रथमेश एन्टरप्राईझेस यांचेशी करारनामा करून जिवनधारा योजने अंतर्गत शहरात ५ ठिकाणी मशिनी लावून १ रू लिटर प्रमाणे पाणीपुरवठा केला जात होता या कंपनीला मिळणाऱ्या ऊत्पन्नातून पालीकेला १० टक्के नफा मिळत होता या संस्थेशी राजकीय पदाधिकारीशी लागेबंधे असल्याचा विरोधी नगरसेवकांनी आज आरोप करित सिंधी कॉलनीतील या प्लँटवर धावा केला हि बाब आज पाणी पूरवठा अभियंता हर्षल सोनवणे यांनी प्रत्येक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता अवैध कनेकशन आढळले.

यावेळी आरोग्य सभापती संजय भिल यांनी स्वतः खोदून केलेले अवैध कनेक्शन दाखवल्याने कर्मचारी अवाक झाले. सिंधी कॉलनी ला १५ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने नागरिक संताप करत होते.यावेळी महिलांनी आक्रोश केला. पाण्याची अवैधरित्या जोडणी करून फूकटचे पाणी जनतेला विकत दऊन पाजले व आर्थीक हित जोपासले असा आरोप गटनेते बबली पाठक यांनी केला हा पाणी घोटाळा लाखो रूपयांचा असून यावेळी हि बाब मूख्याधिकारींना लक्षात आल्याने त्यात तथ्य आढळून आल्याने त्यांनी या ठिकाणी जीवनधारा चा प्लांटला सील केलं. मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले.या प्रसंगी रवींद्र पितांबर पाटील, नगरसेविका शीतल यादव , सुरेश पाटील, आरोग्य सभापती संजय भिल , संतोष पाटील, महेश पाटील, साखरलाल महाजन, शाम पाटील, विरोधी गटनेते बबली पाठक,सलीमभाई टोपी, संतोष लोहेरे, पंकज चौधरी,नरेंद्र चौधरी भाऊसाहेब महाजन बाळासाहेब संदानशिव , सिधि समाज अध्यक्ष श्री आहुजा, दिलीप सिंधी तथा नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. सदर प्लांट चा कार्यालय ला सील करण्यात आले. कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी देखील हजर होते. शहरात ५ ठिकाणी याचे मशिन लावले असून गावात वाहानाद्वारे चालते फिरते पाण्याचे एटीएम म्हणत सर्रास लाखो रूपये कमाई केली जात असल्याचे ऊघड झाले आहे दरम्यान शहरात जिवनधाराचे पाणी घेण्यासाठी सतत गर्दी असल्याने नागरीकांचा पाण्याचा प्रश्न सूटत होता आता पालीकेनेच सिल ठोकल्याने हे पाणी बंद होवून नागरीकांना एैन पाणीबाणीच्या परिस्थीतीत पाण्यासाठी पून्हा वणवण भटकावे लागणार आहे गेल्या १५ दिवसांपासून शहरात पाण्याची टंचाईला नागरीक सामोरे जात आहेत तापी कोरडी पडली अस्मानी व सूल्तानी संकटाचा पालीका प्रशासन सामना करित असतांना जिवनधारा योजना पाण्याचा प्रश्न सोडविणेस पालीकेला कामी येत होती आता पाण्यासाठी जनतेला एल्गार करावा लागतो कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे जनतेने बांधकामासाठी नळाचे पाणी वापरले म्हणून गून्हा दाखल करण्याच्या नोटीसा देणारे आता या पाणी घोटाळ्यातील लोकांवर गून्हा दाखल करतील काय याकडे नागरीकांचे लक्ष लागून असून पालीकेने तातडीने पीण्याच्या पाण्यासाठी ऊपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *