अमळनेर (प्रतिनिधी)मॅरेथॉन स्पर्धेतून तरुणाईच्या उर्जेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश ‘भिकेश भाऊ युवा मंच’ सामाजिक संघटनेतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सडावन येथील दीपक पाटील व यज्ञेश पाटील या दोघा भावांनी बाजी मारली असून सुमारे 3 हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.
“धावेल अमळनेर जिंकेल अमळनेर” “रन फॉर अमळनेर ” म्हणत तरुणांमधील उर्जेला प्रेरणा मिळावी आणि पर्यावरण संवर्धन , वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी 23 रोजी जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह ते स्टेशन रोड , मंगलमूर्ती चौक , उड्डाण पूल मार्गे तालुका क्रीडा संकुल पर्यंत खुली मॅरेथॉन स्पर्धा पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील यांनी आयोजित केली होती माजी आमदार डॉ बी एस पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील ,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , बजरंगलाल अग्रवाल ,माजी जि प सदस्य संदीप पाटील यांच्या हस्ते हिरवे झेंडे दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.
सडावण एथिल दीपक संजय पाटील व यज्ञेश संजय पाटील या दोघा बंधूनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले तर जानवे येथील भूषण मुरलीधर पाटील याने तृतीय क्रमांक मिळवला त्यांना अनुक्रमे 11 हजार ,7 हजार , 6 हजार रुपये रोख बक्षीस तसेच पुढील 10 व्या क्रमांकापर्यंत चे विजेते मनोज पांडुरंग शिंगाणे , विनोद सुनील पाटील , गौरव सोमनाथ बागुल , विनय प्रल्हाद चौधरी , सागर सुखदेव पाटील , चंदन प्रकाश महाजन , शेखर प्रकाश सोनवणे , शुभम शरद पाटील यांना माजी आमदार साहेबराव पाटील , बाजार समिती संचालक पावभा पाटील , जि प सदस्य संगीताताई भिल ,संदीप पाटील ,प्रीतपालसिंग बग्गा ,सिनेट सदस्य दिनेश नाईक , चेतन राजपूत , राजेंद्र पोतदार , महेंद्र रामोसे ,जयेश काटे ऍड राजपूत यांच्या हस्ते गौरव चिन्ह वाटप करण्यात आले सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले आभार भिकेश पाटील यांनी मानले.
मॅरेथॉन स्पर्धा पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक सुनील वाघ, डी डी राजपूत , संजय पाटील , महेश माली , प्रा अमृत अग्रवाल , निलेश विसपुते , संजय बोरसे , के यु बागुल , सचिन वाघ , डी वाय सोमवंशी, व्ही एन सूर्यवंशी , सॅम शिंगाणे ,जे व्ही बाविस्कर , रोहिदास महाजन ,पंकज भावसार , योगेंद्र बाविस्कर,यज्ञेश जगताप, आदींचे सहकार्य लाभले