अमळनेर (प्रतिनिधी) संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट ,( दिल्ली ) शाखा अमळनेर यांच्या वतीने दि 23 जून रोजी चोपडा रोड वरील सिंधी कॉलनी वरील संत निरंकारी सत्संग भवनात सकाळी 9 ते 2 वाजे दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
संत निरंकारी ट्रस्ट च्या मार्फत देशभरात जून महिन्यात वेगवेगळ्या तारखांना भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते . निरंकारी बाबांच्या उपदेशानुसार हिंसे तुन रक्त नालीत न सांडता गरजूंच्या नाडीत जाऊ द्या .त्यांच्या शिकवणी चे पालन करून संस्था सेवेकरी सन1980 पासून अखंडपणे रक्तदान शिबिराचे आयोजन देश विदेशातील शाखांच्या वतीने संकलित झालेल्या पिशव्या रक्त पेढीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया , अपघात ग्रस्त आदी गरजू रुगनाना जीवन देण्याचे कार्य करीत आहेत. सोबतच वर्षभरात सुदृढ़ आरोग्यसाठी स्वछता अभियान, पर्यावरणससंरक्षण करित वृक्ष रोपण या सारखी विधायक व जनसेवेचि कामे ट्रस्ट सतत करीत आहे.
अमलनेर येथील शिबिरास आमदार शिरीष दादा चौधरी यांनी भेट देऊन संत निरंकारी संस्थे च्या वतीने रक्तदानातून गोरगरीब गरजू लोकांचे जीव वाचवन्याचे महान काम होत आहे तसेच मुखी व सेवेकरी च्या वतीने निस्वार्थ हेतु ने चांगले विचार व समाज सेवी कार्याचे मनोगतात कौतुक केले.शिबिरात शंबर च्या वर रक्तदत्यानी उत्स्फूर्त व स्वछेने रक्तदान केले. यात विशेषता महिला व तरुण तरुणिनी मोठ्या संखेत रक्तदान करुण समाजात आगळा वेगळा संदेश पोहचविला. यावेळी अमलनेर येथील मंडळाचे जोनल इंचार्ज श्री हीरालाल जी पाटिल अमलनेर चे मुखी श्री चद निरंकारी , तसेच निरंकारी सेवादल आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.
शिबिर साठी धुळे येथून 1 अम्बुलस आणि डॉक्टर उपस्थित होते. शिबिर सम्पन्न झाल्यावर सगळ्या उपस्थितांचे आभार अमलनेर ब्रांच कडून मानन्यात आले.