अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राला अ मानांकन प्राप्त झाले असून चालू शैक्षणिक वर्षासाठी नवीन कोर्सेसला मान्यता देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९२ पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकने खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्राला (५३२१ ए) ला ‘अ’ मानांकन दिले आहे.
या अभ्यासकात या वर्षापासून खालीलप्रमाणे नवीन अभ्यासक्रम (कोर्स) ला मान्यता दिलेली आहे.
मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन (एमसीए. पी 144) व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटीस्टीक (टी 105) एमसीए व डिप्लोमा स्टॅटीस्टीक या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरु आहे. तसेच बी ए बी कॉम या वर्गांना सुद्धा प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकर प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन खा.शि.मंडळाचे चिटणीस, कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल व खा.शि.मंडळाचे पदाधिकारी तसेच अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख, प्राचार्य, केंद्रसंयोजक यांनी केले आहे.
सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश (सी 3 ई )डिप्लोमा इन इलेक्ट्रीशियन अँड डोमेस्टीक एप्लायन्स मेंटेनन्स (72) या दोन अभ्यासक्रमांसाठी मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याकडे मान्यता मागितलेली आहे.
तरी त्या अभ्यासक्रमांना लवकरच मान्यता मिळेल व या अभ्यासक्रमांची देखील प्रवेश प्रक्रिया लवकरच।सुरु होईल. प्रवेशासाठी कार्यालयाशी सोमवार ते शनिवार दपारी १२ ते ५ व रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२५८७ २२३०३५ असा आहे.