अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेला नुकतीच महाराष्ट्र शासन व DGT नवी दिल्ली यांनी अतिरिक्त फिटर व इलेक्टरीशियन या दोन ट्रेडला मान्यता प्रदान केली आहे.
यामुळे आता संस्थेत प्रथम वर्षाला ४२ फिटर व ४२ इलेक्टरीशियन असे ८४ विध्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग यामुळे मोकळा झाला. संस्थेने ग्रामीण व शहरी भागातील गरीब व मध्यम वर्गीय लोकांनसाठी या वाढीव तुकड्यांन मुळे शैक्षणिक दालन उघडे केले आहे व विध्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. सदर I.T.I चे हे चौथे वर्ष आहे. आता एकूण १६८ विध्यार्थी यापुढे I.T.I चे प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचा रोजगार मिळवू शकतात.
मा.प्रधानमंत्री यांनी घोषित केल्याप्रमाणे कौशल्य विकास या भारत सरकारच्या योजनेला नवीन आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या भारतात येणार त्यांना प्रशिक्षित कामगार पुरवणे हा त्या मागचा हेतू आहे व यामुळे तो साध्य होणार आहे.
I.T.I च्या वाढीव तुकड्या शासनाकडून मंजूर करन जे शैक्षणिक काम केले आहे त्याबद्दल संस्थेचे चेअरमन प्रा.चंद्रकांत भदाणे यांचे सर्व स्तरावरून व मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.