ई.व्हि.एम. हटाओ बाबत भारिप बहुजन महासंघतर्फे घंटानाद आंदोलन

अमळनेर-तहसील कार्यालयासमोर भारिपबहुजन महासंघातर्फे ई.व्ही.एम.हटाओ बाबत आंदोलन करण्यात आले.
नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण झालेले मतदान आणि ई.व्ही.एम.मशीनच्या आकड्यात तफावत आढळून आल्यामुळे २०१९ लोकसभा मतदान प्रक्रिया रद्द करून मतदान बॅलेट पेपरवर व्हावे या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघ तर्फे अमळनेर तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.


निवडणुक काळात ई.व्हि.एम.मशीनमध्ये सेटिंग करून हे सरकार गैर मार्गाने सत्तेत पोहचले आहे तरी आगामी होणाऱ्या सर्व निवडणूका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशा आशयाचे निवेदन यावेळी नायब तहसीलदार कमलाकर जोशी यांना देण्यात आले.या निवेदनावर बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र गोलाईत,कामगार जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद निकम,कामगार तालुकाध्यक्ष सोमा कढरे, तालुका सचिव अविनाश नगराळे सुरसिंग राजपूत,राजेंद्र माळी, बापू भामरे,अल्काबाई बैसाने, मंगलाताई सोनवणे,संजीवनी सोनवणे यांच्या सह्या आहेत. या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष संदीप सैंदाणे, बहुजन रयत परिषद चे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांनी पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *