कळमसरेत एकास मारहाण, चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील गुलाबसिग केसरसीग पाटील वय ६० यांना आरोपी पिंटू आनंदसिग जमादार याने हातातील लाकडी काठीने हातावर व बोटावर मारल्याने हाड मोडले तर त्याचे साथीदार हर्षल पिंटू जमादार, सुरेश बाबुराव महाजन, प्रकाश बाबुराव महाजन यांनी मिळून आज दिनांक १६ रोजी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद गुलाबसिग केसरसीग पाटील यांनी दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्यात भा द वी कलम ३२४,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार श्रीराम पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *