अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील कळमसरे जळोद जि प गटात जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उत्साहात भूमिपूजन करण्यात आले.
यात तांदळी येथे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभाग अंतर्गत 23 लक्ष रुपये निधीतून पाझर तलाव दुरूस्ती, निंब येथे 4.5 लक्ष रुपये निधीतून के.टी.वेअर दुरूस्ती व कळमसरे येथे 9 लक्ष रुपये निधीतून गाव तलाव दुरूस्ती आदी कामांचे भूमिपूजन जि.प.सदस्या सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभियंता वाल्मिक पाटील साहेब, तांदळी सरपंच प्रमोद विश्वासराव पाटील, कपिल परदेशी, स्वप्निल परदेशी, गोपाल पाटील, भगवान पाटील, दत्तात्रय पाटील, नितिन कोळी, पिंटु कोळी, किरण पाटील, आकाश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान तांदळी येथील पाझर तलावाची दुरूस्ती केल्याने तलावाची गळती थांबून पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे.या अतिशय आवश्यक विकास कामाबद्दल परिसरातील ग्रामस्थानी सौ जयश्री पाटील यांचे आभार मानले,तर इतर गावातही विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.