इंदासी धरण ते अंबापिंप्री जलवाहिनीचे काम पूर्णत्वास ;योजनेचे निर्माते आ.शिरीष चौधरींच्या हस्ते झाले जलपूजन,कायमचा सुटला अंबापिंप्रीचा पाणीप्रश्न

अमळनेर(प्रतिनिधी)आपल्या अथक प्रयत्नातून मतदार संघातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सोडविणारे आ. शिरीष चौधरी यांनी अंबापिप्रीत देखील आपली किमया दाखविली असून त्यांच्याच प्रयत्नातून 19 लाख रु निधीतून मंजूर झालेल्या इंदासी धरण ते अंबापिंप्री या 5 किलोमीटर जलवाहिनीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे.
आमदार शिरीष चौधरी यांच्याच हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम अंबापिंप्री येथे मोठ्या थाटात पार पडला,सदर योजनेमुळे या गावाची पाणी समस्या कायमची सुटल्याने सुखावलेल्या ग्रामस्थासह कार्यक्रमाचे आयोजक सरपंच गुलाबराव महाजन यांनी आमदार चौधरी यांचे गावात आगमन होताच फटाके फोडून भव्य स्वागत करत गावात डी जे च्या आवाजात भव्य अशी मिरवणूक काढली आणि गावाच्या वतीने जंगी सत्कार आमदारांचा केला.आमदारांनी आपल्या मनोगतात आमदार निधी मधून 10 लाखांची विहीर गावासाठी मंजूर असून लवकरच तीचे काम सुरू होऊन पूर्णत्वास येणार आहे,यामुळे भविष्यात या गावात कधीही पाणीप्रश्न उद्भवणार नाही अशी ग्वाही आमदारांनी दिली,तर अनेक गावांत टंचाई असताना आमदार चौधरी यांच्या प्रयत्नातून इंदासी धरणातून जलवाहिनी टाकल्याने या गावाला दोन दिवसा आड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ग्रामस्थानी आनंद व्यक्त करत आमदारांचे विशेष आभार मानले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा नगरपरिषदेचे गटनेते बापू तुकाराम महाजन, संचालक कृ.उ.बा. पारोळा प्रा बी एन पाटील, मा उपनगराध्यक्ष अनिल महाजन, मा सरपंच सावखेडे राजेंद्र पाटील, सरपंच गुलाबराव महाजन यांनी मनोगत व्यक्त करून आ चौधरींचे विकास कामांचे कौतुक केले याप्रसंगी ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायत पदाधिकारी व शिरीषदादा मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *