अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते.ह्यावेळी विद्यार्थ्यांना भारत हा संविधानानुसार चालणारा लोकशाही प्रधान देश असुन यामधे निवडणूक प्रक्रिया हा मुख्य घटक असल्यामुळे ह्या प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती होण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या हेड बाॅय व हेड गर्ल पदासाठी होणारी निवड हि निवडणूक प्रक्रियेतून घेण्यात आली.
यावेळी प्राचार्य विकास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया घोषीत झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.तसेच अर्ज भरणे,मुलाखती,माघार,चिन्हवाटप ह्या घटकांचा प्रामुख्याने समावेश होता.यानंतर उमेदवारांना प्रत्येक वर्गात जाऊन प्रचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली होती.व ह्या काळात उमेदवारांनी मतदारांना कुठलेही आमिष दाखऊ नये म्हणुन आचारसंहिता लागु करण्यात आली होती.यानंतर मतदानाच्या दिवशी एका सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली.यात मतदान केंद्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी मतदार रांगेत उभे होते.आत प्रवेश केल्यानंतर यादीत नाव व ओळखपत्र म्हणुन शाळेचे आय कार्ड पाहिल्यानंतर बोटाला शाही लावली जात होती व त्यानंतर गुप्त पद्धतीने बॅलेट पेपर वर उमेदवाराच्या नावापुढे खुन करून मतदान करण्यात येत होते.दुसर्या दिवशी मतमोजणी प्रक्रिया पार पडली त्यात हेड बाॅय पदासाठी देवेंद्र शिवकुमार पाटील व हेड गर्ल पदासाठी सोनम प्रदिप वर्मा यांची निवड घोषीत करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचे संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील,सचिव प्रा शाम पाटील,संचालक पराग पाटील,संचालिका देवेश्री पाटील,प्राचार्य विकास चौधरी, प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी अभिनंदन केले. हि प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.