अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथे उभ्या असलेल्या मालवाहतूक गाडीला धडक दिल्याने एक मोटर सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल १४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पारोळा रस्त्यावर अमळनेर शहरापासून २ किमी अंतरावर घडली.
मयताचे नाव वेचाळ देवसिंग दावऱ्या रा.राजगड सेंधवा जि.बडवाणी मध्यप्रदेश हा सायंकाळी अमळनेरहून पारोळा रस्त्यावर मोटरसायकल ने जात असताना उभ्या असलेल्या मालवाहतूक गाडीला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला त्याचे शव विच्छेदनसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले डॉ जि.एम.पाटील यांनी शव विच्छेदन केले हेडकॉन्स्टेबल सुभाष साळुंखे यांनी पंचनामा केला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
