खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

पोलिसांनी खाक्या दाखवताचं दरोडाचा खोटा गुन्हा उघडकीस ; आरोपीनेचं कबुली दिली गावठी कट्ट्याने स्वतःवर केला गोळीबार….

लुटण्याचा खोट्या गुन्ह्यात फिर्यादीचं निघाला गावठी कट्ट्याचा आरोपी ; दोघांना अटक तर दोन आरोपी फरार

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील गांधली रस्त्यावर चौघांनी एकाला चाकू मारून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना खोटी असल्याचे पोलिसांनी उघड करून फिर्यादीनेच गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गावठी कट्ट्यासह दोघांना अटक केली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की राजेंद्र वासुदेव मराठे रा.नांद्री पातोंडा यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली की ८ रोजी रात्री ८ वाजता ते कामासाठी अमळनेर यायला निघाले असताना त्यांना गांधली येथे मित्राकडे काम होते म्हणून अमळगांव मार्गे मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ , सी.टी.५७५९ ने येत असताना अमळगाव पासून २ ते ३ किमी अंतरावर लघुशंकेला उभा राहिलो असता जळोद गावाकडून पांढरी कार आली व जवळ येऊन थांबली त्यातुन तिशीच्या वयातील काळी पॅन्ट घातलेले दोन जण बाहेर आले व पैसे निकाल म्हणत माझे खिसे चाचपडू लागले परंतु माझ्या खिशात काहीच न सापडल्याने एकाने रागाने धक्का मारला व दुसऱ्याने चाकू मारल्याने छातीच्या डाव्या बाजूला दुखापत झाली मी बाजूला झालो तेव्हा गाडीतील तिसऱ्याने चलो जलदी आवाज दिला व चौथ्याने गाडी वळवून अमळगाव दिशेने ते पळाले मी मोटरसायकल ने त्यांचा पाठलाग केला असता ते जळोद मार्गे पळाले मी चुलत भाऊ महेंद्र हेमंत मराठे याला बोलावून अमळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन रुग्णवाहिका नसल्याने अमळनेर येथे मोटरसायकलने
श्री हॉस्पिटल मध्ये डॉ सूर्यवंशी यांच्याकडे उपचार घेतले या प्रकरणी पोलिसांनी अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी ३९४ , ३४ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क करून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, हेडकॉन्स्टेबल नारायण पाटील , रामचंद्र बोरसे ,विजय पाटील , मनोज दुसाने , नरेंद्र वारुळे ,मुरलीधर बारी , बापू साळुंखे , किशोर पाटील ,सुनील पाटील आदींचे पथक तयार करून धुळे , शिरपूर , चोपडा रवाना केले घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचीन गोरे , चोपड्याचे डी.वाय.एस.पी.अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली.
पोलीस निरीक्षक बापू रोहम व अनिल बडगुजर यांना राजेंद्र मराठे यांच्याकडे चौकशी करत असताना संशय आला राजेंद्र मराठे याने कबुली दिली की जखम ही चाकूने नव्हे तर गावठी कट्ट्याने गोळीबार करून झाली आहे असे सांगितले त्यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांसह पथकाने आजूबाजूच्या परिसरात कट्टा शोधत होते पुन्हा पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच उघडकीस आले की राजेंद्र मराठे हा त्याचे पिंपळी येथील मित्र व मोहसीन सलीम खाटीक हे तिघे अमळगाव येथील संजय चौधरी यांच्या साई पॅलेस हॉटेल मध्ये जेवायला गेले होते तेथे राजेंद्र मराठे याने गावठी कट्टा टेबलावर काढत असताना त्याच्याकडून गोळी फायर झाली आणि ती त्याच्या डाव्या खांद्याजवळ जवळ लागली म्हणून हॉटेल मालकाने त्यांना हाकलून दिले आणि मोहसीन खाटीक यांनी तो कट्टा पिंपळी येथे ठेवला होता कट्टा सापडला मात्र मॅगझीन सापडत नव्हते म्हणून रामचंद्र बोरसे , नारायण पाटील , नरेंद्र वारुळे व इतर पोलिसांनी आपला मोर्चा पुन्हा हॉटेल मालकाकडे वळवला व कसून चौकशी केली असता
आरोपी राजेंद्र वासुदेव मराठे याने आपल्या कब्जात असलेली गावठी पिस्टल बाळगली व ती मोहसीन सलिम खाटीक रा.पिंपळी व भागवत नाईक रा. पिंपळी यांनी पिंपळी येथे लपविली तसेच हॉटेल मालक संजय दौलत चौधरी याने मॅग्झीन सोबत बाळगून त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचे विरुध्द (आर्म ऍक्ट)भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,५/२७ सह भादंवि कलम २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button