सोशल मीडियातील वाचक बंधू भगिनींनो,नमस्कार…

 

खबरीलाल……

दिवस उजळला की आपल्याला गरज असते कोणत्यातरी माध्यमातून बातम्यांची !
कारण
आजूबाजूला काय घडलं?
किंवा काय घडतंय?
काय घडणार?
हे सारं कळण्यासाठी एकमेव मार्ग असतो तो म्हणजे बातम्यांचा…
आणि आपली गरज लक्षात घेऊन
आपल्या पर्यंत येत आहे ऑनलाईन बातम्यांचा एकमेव खबरीलाल….. !

खबरीलाल की नजर हर खबर पर

नमस्कार मंडळी,
वृत्तपत्रातील पत्रकारीतेच्या क्षेत्रात दिर्घ अनुभवानंतर आम्ही आज २२ ऑगष्ट २०१८ पासून आपणासमोर आणत आहोत…!
“ऑनलाईन खबरीलाल

‘खबरीलाल’ या नावातच सार काही आहे!
प्रत्येक क्षेत्रातील बित्तमबातमी म्हणजे आतली खबर आपणापर्यंत पोहचविणार आपला लाडका लाल… खबरीलाल …..!

माहितीच्या विस्फोटात आपल्या हिताला- अहिताला साधक आणि बाधक अश्या सर्व घटनांच्या मागील खबरबात सांगेल तो म्हणजे खबरीलाल…..!
आपल्या जगण्याच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणाऱ्या क्षेत्रातील घडामोडींबाबत खबरीलाल असेल दक्ष !
सरकारी कार्यालय ते खाजगीतले धंदे यावर सर्वसामान्यांच्या हितासाठी खबरीलाल ठेवेल लक्ष !
समाजातील चांगल्या वाइट  घटनांचे परिणाम समाज मनावर होत असतो!
याची आम्हाला जाणिव आहे म्हणून समाजमनाचा विचार करून पत्रकारिता करणे हे आमचे नैतिक मुल्य आहे.
पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा खांब संबोधला जातो आणि तो खांब अधिकाअधिक भक्कम करनं हे
आमचे उदिष्ट आहे.
सुदृढ लोकशाहीतच भारतातील जनमानसाचं खर अस्तित्व आहे हे आम्ही जाणतो म्हणून लोकशाहीचा चौथा खांब समाज व देश द्रोहींच्या घटना बाह्य वर्तनाने डळमळीत करू इच्छिणाऱ्यावर खबरीलाल वचक ठेवणार…!
सरकारी कार्यालयातील बाबूगिरी राजकारणातील चमचेगिरी, सत्ताकारणातील दादागिरी,
गल्लीबोळातील भाईगिरी
करणाऱ्यांच्या कळपात खबरीलालचे हस्तक आहेत जे अश्या कळपातून बित्तम बातमी आमच्या मार्फत आपणाकडे पोहचवतील..!
बातमी अशी जी कुठेही घडो…. ती आपणापर्यत सत्य स्वरुपात सादर करण्याचे काम करेल खबरीलाल..!
वाईट,अन्यायकारक, घातकी गोष्टी समाजाला दाखविण्याचं काम खबरीलालचं आहे.
तसेच या वाईटटावर उमटणारी समाजाची प्रतिक्रिया जाहीर करनं हे ही खबरीलाल आपल आद्यकर्तव्य मानतो!

बातमी मागची बातमी शोधून आपल्याकडे आणतांना खबरीलाल कसलीही परवा करणार नाही. यापुर्वीच्या काळात हि आम्ही कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही.
बदमाशवृत्तीला हुगडे नागडे करण्याची ताकद खबरीलालने कमावली आहे.तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची कुवतहि खबरीलालची आहे. बातमीच्या क्षेत्रात कुणाशीही खेटण्याची हिम्मत खबरीलाल मध्ये आहे. सत्य रेटण्याचे कौशल्यही खबरीलाल ने आत्मसात केलय.
भांडवलदारी वृत्तपत्राच्या भाऊ गर्दीत आपला छोटा खबरीलाल मोठं कार्य करण्यात पटाईत आहे.
समाज मनाचा आरसा खबरीलाल मधून
दाखवनं आणि पत्रकारितेच ब्रीद म्हणजे ‘सत्य मांडण’ हे खबरीलाल प्राणपणाने जपेल.
राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या उपदेशानुसार
“सत्य असत्याशी मन केले ग्वाही।
मानिले नाही बहुमता।”

असा निर्धारपूर्वक सत्य मांडण्याचा कृतीसंकल्प खबरीलालचा आहे
समाजच आपण देणं लागतो हि कृतज्ञतेची भावना खबरीलाल कधीच विसरणार नाही. समाजातील सामाजिक,शैक्षणिक,सांकृतिक व कौतुकास्पद उपक्रम सामाजासमोर मांडण हे येणाऱ्या काळात खबरीलाल  करेलचं  हे आपणास सांगणे नको….!

आपलाच
‍खबरीलाल Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *