अमळनेर सह जिल्ह्यांतून मोठया प्रमाणावर युवकांची उपस्थिती – प्रविण महाजन
अमळनेर (प्रतिनिधी) माळी समाजाचे अधिकृत व्यासपीठ महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सर्व विश्वस्त मंडळाच्या आदेशाने महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय आढावा महाबैठक सर्व कार्यकर्त्याच्या प्रवासाच्या सोईनुसार मुबंई ऐवजी ही महाबैठक दिनांक ०९/०६/२०१९ रविवार रोजी दु ०१:३० वाजता प्रदेश कार्यालय अनिल महाजन मिस्ट्री हिल बंगला न.12 जैन मंदिर जवळ लोणावळा येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकित एक सामाजिक संघटन म्हणून महासंघाची काय भूमिका असली पाहिजे त्यावर चर्चा करणयात येणार आहे व प्रत्येक मतदारसंघात माळी समाजाचे मतदान हे निर्णयाकारक आहे. याचे राजकीय समीकरण कसे असले पाहिजे व विधानसभेच्या निवडणुकीत माळी समाजातील उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे राहतील त्या त्या ठिकाणी महासंघाचे कसे नियोजन असले पाहिजे व त्या माळी उमेदवाराला कशी मदत करायची या बाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच त्या उमेदवाराचे सामाजिक योगदान काय ? समाज कार्यात त्याचा सहभाग किती आहे या सर्व विषयाबाबत या महाबैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे संघटन ज्या भागात तालुक्यात किंवा जिल्ह्यात कमी असेल त्या त्या ठिकाणी संघटनात्मक बदल करणे बाबत व नवीन युवकांना संधी देण्याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे.
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकित वेगवेगळ्या पक्षाकडून किंवा अपक्ष माळी समाजातील राज्यभरात किती उमदेवर इच्छुक आहेत व एक समाज म्हणून आपण त्यांना काय मदत करू शकतो व त्यांचे समाजात, समाज कार्यात काय योगदान आहे हे तपासून महाराष्ट्र माळी समाज महासंघ सर्वांच्या विचाराने यांना कशी मदत करायचे ते रणनीती या बैठकित आखनार आहे या साठी जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील महासंघाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी युवक यांनी या महाबैठकिस मोठ्या प्रमाणावर उपस्तीत राहावे असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रविण बी.महाजन यांनी केले आहे.अधिक माहिती साठी 9273326111,9822801655 या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रवीण बी.महाजन
प्रदेश संघटक महाराष्ट्र माळी समाज महासंघ 9273326111