शेतकऱ्यांची शेकडो बैलगाडीसह प्रांत कार्यालयावर धडक ; कार्यकारी अभियंत्यांचा दिरंगाईमुळे निघाला मोर्चा…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर धार पाझर तलावात बोरी नदीतून पावसाळ्यात बोरी नदीतून ब्रिटीशकालीन चारीद्वारे पुनर्भरण करा या मागणीसाठी  धार परिसरसरातील शेतकर्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर १०० ते १५० बैलगाडी आणून पाणी मिळालेच पाहिजे अशा आशयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
तालुक्यातील बोरी नदीवरील फापोरे ते पिंपळे नाला पाटचारी यातून १९७० च्या जवळपास कालावधीत अमळनेर शेतशिवाराला पाणी दिले जात होते. तो पुनर्वापर करून धार पाझर तलाव भरावा यासाठी आंदोलन होते. या पद्धतीने बुजलेल्या पाटचार्या खोलीकरण करून पावसाळ्यात वाहून जाणारे पाण्याद्वारे पुनर्भरण करता येईल. हे अंतर ४ ते ५ किमी येईल व जुनी पाटचारी पोकलँड मशिनद्वारे खोदून जवळपास अंदाजे 44 लाख रुपयांपर्यंत सर्व्हे करून अंदाज पत्रक गिरणा पाटबंधारे खात्याने केले आहे.

हे काम थ्री आर या योजनेत समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर आंदोलन होणार याची माहिती असतानाही गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंता व त्यांच्या खात्याने यांनी दिरंगाई केल्याने हा मोर्चा निघाला असा आरोप यावेळी आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रा. गणेश पवार, फाफोरे सरपंच जितेंद्र पाटील, धारचे सरपंच एच.एस. पाटील, अंबारे सरपंच सतीश पाटील, पंचायत समिती सभापती शाम अहिरे,  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, गणेश धोंडू पाटील यांनी केला आहे. कार्यकारी अभियंता यांनी चक्क आता हा प्रस्ताव नियोजन विभाकडे पाठवला आहे. अशी माहिती मिळताच यामुळे आंदोलनकर्ते चिडले होते. यावर तहसिलदार ज्योती देवरे यांच्या दालनात सचिन पाटील,गिरणा पाटबंधारे उपअभियंता एस.आर मिठे, कनिष्ठ अभियंता अजिंक्य पाटील एस आर शिंपी, लिपिक एस. आर.पाटील, निम्न तापी प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकुर,पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी याबाबत थेट राज्यस्तरीय नियोजन सचिव यांना संपर्क साधत याबाबत चर्चा केली असता रविवार पर्यंत माझ्याकडे प्रस्ताव आलेला आहे. लवकर वित्त विभागाकडे पाठविण्यात येईल असे संगितले. कार्यकारी अभियंता यांनी लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी आंदोलकांचे समाधान झाले. व ११ ते तब्बल अडीच वाजेपर्यंत भर उन्हात शेतकरी बैलगाड्या सोडून आश्वासनाची प्रतीक्षा करत उभे होते. तहसिलदार देवरे यांनी बैलांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांना बोलावून केली.


पिण्याला पाणी नाही याचे सोयरसुतक नाही गेल्या काही दिवसां पासून दहा वेळा आंदोलने स्थगित करीत येथील शेतकरी वाट पाहत होता. मात्र या गिरणा पाटबंधारे विभागाने कशाचीही तमा न बाळगता दिरंगाई केली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बैलगाडी आणून प्रांताधिकारी कार्यालयावर सोडण्यात आल्या. बैठकीत चांगलीच अधिकार्‍यांची झाडाझडती मोर्चेकर्‍यांनी घेतली. आम्हाला पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा असे सुनावले.

शिस्तीत आणल्या बैलगाड्या,बैलगाडीवर खाली पाण्याचा ड्रम, चारा असे साहित्य होते. तसेच या आंदोलनासाठी चक्क प्रांत कार्यालयात दोन बैलगाड्या आणून सोडल्या होत्या. व शेतकर्यांनी चक्क उपोषण सुरु केले होते. याबाबत गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करीत तहसिलदार देवरे या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. सदर काम थ्री आर योजनेत समाविष्ट झाल्याने ते थेट राज्य समितीपर्यंत पोहचते. यात दिरंगाई झाली नसती तर मोर्चा निघाला नसता. असा सूर आंदोलनकर्त्यांनी काढला.

तहसिलदार देवरे यांच्या सुचनेतून लोकसहभाग –

शासन करेल तेव्हा करेल मात्र तोपर्यंत पावसाळा सुरू झाला तर फायदा नाही ही बाब हेरून लोकसहभागातून हे काम सुरू करण्याची सूचना तहसिलदार देवरे यांनी केली. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन सर्व जण या बाबीला राजी झाले. यासाठी मारवड विकास मंचच्या जेसीबीद्वारे चारी खोदकाम सुरू करून आज दि ४ मे पासून हे काम नारळ वाढवून पाटबंधारे खात्याच्या अधिकारी यांच्यासमोर सुरू करण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी डिझेल आणि ड्रायव्हरसाठी 11 हजार रुपये देण्याचा संकल्प केला. तर अजून काही जणांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. यात अडणारी अतिक्रमणे देखील हटवण्यात येतील अशी चर्चाही यावेळी करण्यात आली. कायम प्रश्नावर लोकसहभाग तोडगा काढत तहसिलदार देवरे यांनी या विषयाला गती दिली. यामुळे मोर्चेकर्‍यांनी देवरे यांचे आभार मानले. व १५ दिवसात चारी तयार होईल याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *