आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आनोरे गावाने दिले श्रमपरिहार…

माजी आमदार कृषिभूषण यांनी अमळनेर ते आनोरे एस. टी. बसने केला प्रवास.

अमळनेर (प्रतिनिधी) पाणी फौंडेशन ची स्पर्धा आटोपली उद्दीष्ट पेक्षा जास्तीचे काम झाले मात्र श्रमदान आणि आर्थिक मदत करणाऱ्या समाजसेवक व संस्थांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आनोरे गावाने श्रमपरिहार करून १००० लोकांना आंब्याचा रस व पुरण पोळीचे जेवण देऊन एस टी चा वर्धापन दिन साजरा केला.

१ जून रोजी आनोरे गावाने ग्रामदेवतेची स्थापना करून गावातून मिरवणूक काढली त्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेरहून एस टी ने आनोरे पर्यंत प्रवास केला आनोरे येथे एस टी आल्यानंतर गावातील महिलांनी पूजा करून माजी आमदार साहेबराव पाटील एस टी चे तसेच चालक व वाहकाचे स्वागत केले आनोरे गावाला पाणी फौंडेशनच्या कामासाठी सहकार्य करणाऱ्या मंगळग्रह संस्था , अमळनेर महिला मंच , पत्रकार , समाजसेवी संस्था , कृषी अधिकारी आदींचे स्वागत करून गावातून मिरवणूक काढली सर्व मदतनीसांचे आभार मानून श्रमपरिहार करण्यात आला गावातील महिलांनी सकाळ पासून १००० लोकांचा पुरण पोळी व आंब्याचा रस असा स्वयंपाक केला होता यावेळी संदीप पाटील यांनी सांगितले की श्रमदानातून २७०० घनमीटर काम करायचे होते मात्र गावाने ६००० घनमीटर काम केले तसच मशीन कामातून ५०००० घनमीटर काम करणे गरजेचे असताना ५४ हजार घनमीटर काम केले आहे.

५० दिवसात ५ लाख कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असलेले साठवण खड्डे करण्यात आले आहेत गावात शंभर टक्के शोष खड्डे करण्यात आल्याने एकही डास नाही गावात एक डास दाखवा व लाख रुपये मिळवा असे आवाहनच अनोरेकरानी दिले २०० वृक्ष लागवड करणे अपेक्षित असताना ३५० वृक्ष लागवड केली आहे १४०० रोपे तयार असून एक मिनिटात १४०० झाडे लावण्यात येणार आहेत १४ शेततळे करण्यात आले आहेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४ हजार लिटर इंधन जे सी बी साठी दिले तसेच वॉटर हार्वेस्टिंग साठी १४ लाख रुपये देखील दिले आहेत.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील , जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील , जिल्हा कृषी अधीक्षक अनिल भोकरे ,कृषी अधिकारी भारत वारे ,पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर , मंगळग्रह चे अध्यक्ष डिंगबर(राजू) महाले , उपाध्यक्ष एस एन पाटील , संजय पाटील , जितेंद्र ठाकूर , नगरसेवक मनोज पाटील , निशांत अग्रवाल महिला मंच च्या डॉ अपर्णा मुठे , भारती पाटील,जयश्री साळुंखे , रेणू प्रसाद,अपेक्षा पवार , सुधीर सूर्यवंशी , रणजित शिंदे , बाजीराव पाटील,यासह असंख्य गावकरी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *