अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या शाळा समित्या तसेच प्रताप कॉलेज विकास कमिटी,ज्यू कॉलेज कमिटी,तिन्ही शाळांची कॉर्डिनेशन कमिटी,प्राथमिक शाळा समिती व कॉलेज ऑफ फार्मसी आदी कमित्यांचे चेअरमन व सदस्यांची निवड कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल यांनी जाहीर केली असून विविध संस्थांवर सर्व संचालकांना संधी देण्यात आली आहे.
यात प्रताप हायस्कुल चेअरमन नीरज दिपचंद अग्रवाल,ग स हायस्कुल चेअरमन योगेश मधुसूदन मुंदडे,द्रो रा कन्या शाळा चेअरमन डॉ बी एस पाटील,पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कुल चेअरमनपदी खा शि मंडळाचे कार्योपाध्यक्ष डॉ संदेश गुजराथी,प्रताप कॉलेज विकास समिती चेअरमन कार्याध्यक्ष प्रदीप कुंदनलाल अग्रवाल,प्रताप कॉलेज ज्यू कॉलेज कमिटी चेअरमन कार्याध्यक्ष प्रदीप कुंदनलाल अग्रवाल,कै आर एस पाटील प्राथमिक शाळा,कै एस पी भांडारकर प्राथमिक शाळा,दौ रा कन्या प्राथमिक शाळा चेअरमन कल्याण साहेबराव पाटील तसेच खान्देश शिक्षण मंडळ समन्वय समिती चेअरमन हरी भिका वाणी आणि कॉलेज ऑफ फार्मसी चेअरमनपदी जितेंद्र मोहनलाल जैन यांची निवड करण्यात आली आहे.वरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती एक वर्षासाठी दि 25 एप्रिल 2020 पर्यंत असून सदर निवडीबद्दल सर्वत्र पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
