अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे सुजाण मंगल कार्यालयात ४ रोजी हळदीच्या कार्यक्रमात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भानगडीत दुसऱ्या गटाविरुद्ध ही ६ जणाविरुद्ध दरोडा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताडेपुरा भागातील साईबाबा नगर मधील समाधान गभा बिऱ्हाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली की मी व माझा चुलत भाऊ अजय अनिल बिऱ्हाडे आम्ही नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमात ४ रोजी सुजाण मंगल कार्यालयात जेवायला गेलो असता अरविंद देविदास बैसाणे , बापू इसन बैसाणे , विक्की मुरलीधर वानखेडे , गणेश सुनील बैसाणे, प्रवीण देविदास बैसाणे , देवा इसन बैसाणे व इतर ३ अनोळखी इसम एम एच ३९- १९१७ या चार चाकीतून आले आणि मागील भांडणाचा वाद उकरून अरविंद मोठ्याने शिवीगाळ करू लागला तुम्हाला मागच्या वेळेस जाऊ दिले आता सोडणार नाही मला दोन लोकांना मारण्याची परवानगी आहे असे म्हणत हातातील चाकूने अजय च्या पाठीवर मागून वार करून दुखापत केली मी अजयला सोडवायला गेलो असता वरील सर्वांनी हातातील लाठ्या काठ्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले माझ्या कपाळावर दुखापत करून प्रवीण याने गळ्यातील १० ग्राम वजनाची साखळी हिसकावून घेतली यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी ३९५ , ३२६, १४३ , १४७ , १४९, ३२३ , ५०४ , ५०६, १३५ प्रमाणे वरील ६ व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध दरोडा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ए पी आय प्रकाश सदगीर करीत आहेत.