अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांच्या उपस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांनी महाश्रमदान केले.
काल सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यां समवेत इतर अधिकाऱ्याचे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले नंतर लगेच भूमातेच्या पूजनांनंतर प्रत्यक्ष
स्वत: जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी श्रमदान करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे पोहचले.
या तालुक्यांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदान करून स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठ त्यांनी आज ७ मे २०१९ रोजी सकाळी मातीबांधसाठी श्रमदानाला सुरुवात केली. व गावकर्यांचा उत्साह वाढविला.
सातत्याने होणारे अवर्षण.. अवेळी पडणारा पाऊस.. कमी कालावधीत तीव्रतेचा पाऊस.. ही सर्व आताच्या लहरी निसर्गाची काही उदाहरणे आहेत. या परिस्थितीमुळे भूजल खालावत आहे आणि नेमेची येते पाणीटंचाई ही उक्ती रूढ होत आहे. ही परिस्थिती बदलविण्यासाठी .. भूजल पातळी वाढण्यासाठी जलसंधारण व मृदसंधारणाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून वाटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यांचा समावेश आहे.
गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे म्हणाले की निसर्गाची जशी देण्याची प्रवृत्ती आहे तशी काढून घेण्याची पण आहे सध्या निसर्ग आपल्याकडून काढून घेत आहे निसर्गाशी छेडछाड करू नका झाडे तोडू नका आहे तशीच राहू द्या निसर्ग आपोआप देईल आणि एकजुटीने सर्वांनी श्रमदान करून गावातील पाणी गावातच अडवले तर कोणाकडे काही मागण्याची गरज पडणार नाही त्यानंतर आमदार स्मिता वाघ , माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी , ग्रामसेवक , तलाठी , शिक्षण विभाग , पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी सामूहिक रित्या श्रमदान करून चारी खोदून शेतात बांध बांधले.
माजी आमदाराने दिले दोन महिन्याचे वेतन गावकऱ्यांनी निधीची मागणी केली असता माजी आमदार साहेबराव पाटील यांनी एका महिन्याचे निवृत्ती वेतन आधी मदत म्हणून दिले होते पुन्हा एक महिण्याचे निवृत्ती वेतन देण्याची घोषणा केली.
पाणी पाजून अपंग महिलेची मदत….
गेल्या महिन्याभरापासून आनोरे महेर असलेले अपंग वृद्ध महिला खताबाई रतन पाटील ही बसून बसून श्रमदान करणाऱ्या लोकांना पाणी पाजत असते तिची ही मदत पाहून जिल्हाधिकारींनी कौतुक केले.
यावेळी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार साहेबराव पाटील , नगराध्यक्षा पुष्पलता पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, अधीक्षक अनिल भोकरे , प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे , गटविकास अधिकारी अजय नष्टे , सहाययक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , कर अधिकारी संजय चौधरी , ग्रामसेवक कमलेश निकम ,माजी जिप सदस्य संदीप पाटील , शिवाजी पाटील , संतोष बिऱ्हाडे , अरुण कदम , भाऊसाहेब पाटील ,दिनेश सोनवणे , नितीन ढोकने, संदीप पाटील, दीपक पाटील ,पाणी फौंडेशन चे आप्पासो पाटील व इतर पदाधिकारी हजर होते.
गावात ठिकठिकाणी रांगोळी टाकण्यात आली होती.
नगरपरिषदेने शुद्ध थंड पाण्याची एक विशेष गाडी पाण्यासाठी ठेवली होती. ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल व गायत्री ट्रॅव्हल्स ने कर्मचारी ने आन साठी बसेस ची व्यवस्था केली होती.