१ लाख ३६ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले ; अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बसस्थानकात शिरपूर बसमध्ये चढताना एक महिलेची पर्स लांबवून अज्ञात चोरट्याने एक लाख ३६ हजार रुपये किमतीची साडे सहा तोळे सोने लांबवल्याची घटना ६ रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर बस स्थानकावर घडली.
सरला माणिकराव वाघ ही महिला ६ रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा येथून अमळनेर बसस्थानकावर आल्यानंतर शिरपूर जाण्यासाठी बसची वाट पाहत होती सायंकाळी ५ वाजता अमळनेर शिरपूर बसमध्ये बसल्यानंतर त्यांना लक्षात आले की त्यांच्या हातातील पर्स गायब झाली आहे त्यात ४० हजार रुपयांची २० ग्राम मिनी पोत, ७० हजार रुपये किमतीची ३५ ग्राम मोठी पोत, १० ग्राम वजनाची २० हजार रुपयांच्या सोन्याच्या रिंगा, ३ हजार रुपयांच्या चांदीच्या साखळ्या आणि ३ हजार रुपये रोख आशा ६५ ग्राम वजनाचे 1 लाख ३६ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास भारत ईशी करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *