आज अक्षयतृतीयानिमित्त अनोरे येथे जिल्हाधिकारी करणार श्रमदान…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आर्डी आनोरे या गावात वाटर कप या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने येथील नागरिकांचा उत्साह वाढावा या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी यांची टीम अक्षयतृतियाच्या शुभमुहूर्तावर आज सकाळी सहा वाजता श्रमदानासाठी येणार आहेत.

७ मे २०१९ रोजी पाणी फाऊंडेशन ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-4’ साठी आर्डी आनोरे या गावात महाश्रमदानाचे आयोजन सकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील या अभियानात सहभागी होणार आहे. तरी या श्रमदानासाठी परीसरातील गावातील तरूण, नागरीक, पंचायत समितीचे व महसूल, आरोग्य, बांधकाम समितीचे कर्मचारी,नगरपरिषद, विविध संघटना, यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी आमदार स्मिताताई वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, अमळनेर चे नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, व प्रांतधिकारी सिमा अहिरे, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकाधिकारी अजय नाष्टे, संदीप वायाळ, महसुल व पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी व कर्मचारी सर्व पत्रकार बांधव व पाणी फाऊंडेशन ची टीम तालुक्यातील जलमित्र जलदुत, पर्यावरण प्रेमी समाजसेवक व परिसरातील सर्व ग्रामस्थ अनोरे गाव पाणीदार करण्यासाठी ह्या महाश्रमदानात सहभागी होणार आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *