या धक्कादायक घटनेत मालमत्तेचे ८ ते १० लाखाचे नुकसान

अमळनेर( प्रतिनिधी) मागासवर्गीय समाजाच्या मुलाने सवर्ण समाजाच्या मुलीशी लग्न केले म्हणून संतप्त गावकऱ्यांनी मागासवर्गीय कुटुंबाचे घराची मोडतोड करून सामानाची लूट केली दहशत निर्माण करून बहिष्कार टाकल्याची घटना २० रोजी रात्री १ ते २ दरम्यान घडली
टाकरखेडा येथील आत्माराम गंगाराम पवार यांचा मुलगा संदीप ह मु सुरत याचे एक सवर्ण समाजातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याने त्याने तिच्याशी पळून जाऊन विवाह केला ते कुटुंब आंबेडकर जयंतीनिमित्त गावी आले होते २० रोजी रात्री एक ते दोन च्या सुमारास प्रल्हाद पाटील , युवराज पाटील , प्रकाश पाटील , विलास पाटील , शंतनू पाटील , युवराज देवराम पाटील , विश्वास पाटील , राजेंद्र पाटील , शांताराम पाटील , भास्कर पाटील , श्रीराम पाटील , रामचंद्र पाटील , नाना पाटील , जगदीश पाटील , धनराज पाटील , बाळू पाटील , नामदेव पाटील , मयूर पाटील, मनोज पाटील , महेश पाटील , संदीप पाटील , अतुल पाटील , किरण पाटील , ज्ञानेश्वर पाटील , सोपान पाटील ,ज्ञानेश्वर नागराज पाटील ,पितांबर व इतर १५० ते २०० लोकांनी २० रोजी रात्री १ ते २ दरम्यान लाठ्या काठ्या पेटत्या मशाली घेऊन घरात घुसून घराची तोडफोड केली नासधूस करून घर पूर्ण पाडून टाकले आणि आरडाओरड करून नुकसान करून टाकले दहशत निर्माण केली. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी पळ काढून अमळनेर येथे फरशी रोडवर आश्रय घेतला त्यावेळी सवर्ण समाजाच्या लोकांनी दम दिला की पुन्हा गावात पाय ठेवू नका नाहीतर तुमचा खून होईल अशा प्रकारची फिर्याद आत्माराम गंगाराम पवार यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी १४३, १४७ , १४८, १४९ प्रमाणे दंगल , ३९५ प्रमाने लूटमार तर ४२७ प्रमाणे मालमत्तेचे ८ ते १० लाखाचे नुकसान केले म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास डी वाय एस पी राजेंद्र ससाणे करीत आहेत.
घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अमळनेर पोलीस स्टेशनला येऊन अधिकाऱ्यांना कायदेशीर मार्गाने तपास करा निरपराध व्यक्तींना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या आहेत.
