अमळनेर (प्रतिनिधी )तालुक्यातील सबगव्हान येथील दगडू वेडू पाटील वय २८ या तरुणाने लग्न जमत नसल्याने नैराश्यातून आज दिनांक २६ रोजी पहाटे आपल्या स्वतःचे शेतात निंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अमळनेर येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर नरेंद्र महाजन यांच्याकडे नऊ हजार रुपये महिन्याने कामावर असलेल्या या तरुणाकडे फक्त दोन एकर शेती होती म्हणून तो बाहेर कामावर होता होतकरू व मेहनत करणाऱ्या या तरुणाचे गावात साधे घर व कमी जमीन असल्याने लग्न जुळून येत नव्हते म्हणून तो नैराश्याने ग्रासलेले होता रोजी रोटी साठी कमवून ही मुलगी मिळत नाही व लग्न जुळून येत नाही म्हणून त्याने आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या सबगव्हान शिवारातील वेडू चैत्राम पाटिल यांचे शेतातील निंबच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन काल पहाटे आपली जीवनयात्रा संपविली असल्याची ही घटना काल दिनांक २६ रोजी सकाळी ८ वाजता गावातील शेतकरी अविनाश भीमराव पाटील हे शेतात काम करण्यासाठी जात असताना त्यांना दगडू याने गळफास गातलेल्या स्थितीत आढळून आला असता त्यांनी गावात ही माहिती दिली व पोलिसाना ही माहिती कळताच मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील ,सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव, हवालदार भास्कर चव्हाण यांनी घटनास्थळी शेतात जाऊन पाहणी करून पंचनामा केला व वडिल आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार व वडिलांनी दिलेल्या जबाबवरून मारवड पोलीस ठाण्यात पोलिसांना दुपारी १२ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, मृत तरुणाचे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ ताडे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यावर दुपारी ५ वाजता सबगव्हान येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत