
अमळनेर(प्रतिनिधी)भिलाली ता अमळनेर येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी युवक काॅग्रेस तथा समता परीषदेचे तालुकाध्यक्ष चि अमोल दिनेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.अमोल माळी हे सर्वात कमी वयाचे व विशेषत अविवाहित सदस्य म्हणुन निवडुन आलेले आहेत.त्यात उपसरपंच पदाची जबाबदारी मिळाल्याने सर्व ग्रामस्थांनी सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्या एका युवा कार्यकर्त्यावर विश्र्वास दाखविला आहे.निवडणुक अधिकारी म्हणुन विलास पाटील यांनी काम पाहीले.
यावेळी सरपंच सौ छायाबाई लोटन पाटील, ग्रा पं सदस्य भाऊसाहेब दाजभाऊ राजपुत,सीमा पंडीत पाटील,कपुबाई कोमलसिंग राजपूत,छायाबाई उमेश माळी,विलास आत्माराम घोडे,शेवळाबाई आसाराम भिल यांसह दिनेश माळी, प्रा पी के पाटील,अविनाश पाटील,गंगाराम राजपूत,लोटनससिंग राजपूत,दगा माळी,वना माळी,उमेश माळी,गोटन गिरासे,संजय गिरासे,गोबु राजपुत,कोमल राजपूत,लक्ष्मण माळी,मोतिलाल माळी,प्रविण घोडे,दादु माळी,सुभाष पाटील,कैलास पाटील,परेश माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.