आज कार्यकारी मंडळाच्या सभेत होणार अधिकृत निवड
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी प्रदीप कुंदनलाल अग्रवाल तर कार्योपाध्यक्षपदी डॉ संदेश बिपिन गुजराथी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आज दि २६ रोजी सकाळी ९:३० वाजता प्रताप महाविद्यालयातील संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या सभेत अधिकृत निवडीची घोषणा केली जाणार आहे.
खा शि मंडळाची निवडणूक मागील वर्षी झाल्यानंतर प्रथम कार्याध्यक्ष पदाची संधी नीरज अग्रवाल तर कार्योपाध्यक्ष पदाची संधी जितेंद्र जैन यांना देण्यात आली होती,त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय विकासकामे होऊन संस्थेचे ऑडिट व जनरल सभा देखील यशस्वी झाली,तसेच प्रताप महाविद्यालयास स्वयंत्त दर्जाही प्राप्त झाला,प्रताप शेठजी व भागीरथी देवी यांच्या पुतळ्याचे अनावरण,नवी प्रशस्त इमारत व मान्यवरांच्या देणगीतून विविध नामकरण आदी कामे अत्यंत महत्वपूर्ण ठरली.अग्रवाल व जैन यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नविन संधी कुणाला याबाबत अनेक नावे चर्चेत होती अखेर कार्यकारी मंडळाच्या पार्टी मीटिंगमध्ये प्रदिप अग्रवाल व डॉ गुजराथी यांची नावे सर्वानुमते निश्चित करण्यात आली आहेत.तरुण तडफदार,क्रियाशील व सुस्वभावी व्यक्तिमत्व प्रदिप अग्रवाल हे प्रथमच संस्थेवर प्रथम क्रमांकाच्या मतांनी निवडून आले असून अमळनेर अर्बन बँकेचेही ते क्रियाशील संचालक आहे,माजी कार्याध्यक्ष कुंदनलाल अग्रवाल यांचा वारसा यशस्वीपणे ते चालवीत आहेत,तर डॉ संदेश गुजराठी हे संस्थेचे अत्यंत अनुभवी व जेष्ठ संचालक आहेत,यामुळे हे दोन्ही नूतन पदाधिकारी निश्चितपणे संस्थेला न्याय देतील असा विश्वास व्यक्त होत आहे.आज होणाऱ्या निवड प्रसंगी सर्व सभासद,हितचिंतक व मित्र परिवाराने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.