अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील ड्रीम सिटी जवळील राजे संभाजी नगर मध्ये २७ सप्टेंबर २०१८ रोजी मध्यरात्री एक दीड वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत औरंगाबाद येथील युवकाचा संशयास्पद मृत्यूप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने अमळनेर पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद येथील योगेश कुमावत या युवकाचा ड्रीम सिटी संभाजी नगर मधील रहिवाशी माधुरी या तरुणीशी लग्न झाले होते लग्नानंतर युवतीशी खटके उडाल्यानंतर तिने माहेर गाठले होते त्यानंतर पत्नीची समजूत काढण्यासाठी आलेल्या युवकावर त्या मुलीच्या कुटुंबीयांनी रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या असा आरोप मयत च्या कुटुंबाने केला आहे. त्यानंतर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकावर धुळे आणि मुंबई येथे उपचार सुरू होते दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला दरम्यान युतीच्या कुटुंबीयांनी बनाव करून बॅटरीचा स्फोट झाला व त्यात आमची मुलगीही गंभीर जखमी झाली असे युवकाच्या कुटुंबीयांना सांगितले होते दरम्यान पोलिसांनी योगेशच्या कुटुंबियांकडून संबंधित व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती म्हणून मयत योगेश याच्या कुटुंबीयांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्याची सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने युवतीसह तिच्या कुटुंबियातील ७ सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
योगेशच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली होती व त्यानुसार अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र कुटुंबीयांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर या प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात मंगलाबाई सुरेश कुमावत यांनी तक्रार दाखल करण्यात आली होती त्या तक्रारीनुसार सुनावणी अंती न्या टी व्ही नलावडे व न्या मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने माधुरी कुमावत अमृता उदेवाल बळवंत उदेवाल नंदिनी उदेवाल गिरीश उदेवाल महेश कुमावत रेणुका कुमावत या सर्वांविरुद्ध करण्याचे खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत
योगेश विरोधात गुन्हा दाखल – यापूर्वी माधुरी कुमावत यांच्या कुटुंबीयांनी बॅटरीचा स्फोट झाल्याने त्यात दोन्ही जखमी झाल्याबाबत योगेश विरुद्ध अमळनेर पोलिसात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
योगेश हा माधुरी ला भेटायला आलेला होता योगेश सोबत दीड लाख रुपये सोबत घेऊन मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो सात आर 2234 ही घेऊन अमळनेरला आला होता. त्यानंतर ही सर्व घटना घडली होती