मतदान असूनही भाविक द्वीशताब्दी कार्यक्रमात सहभागी, १० हजार लोकांना महाअन्नदान.

पारंपरिक पद्धतीने अग्नि प्रज्वलित

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे मंगळवारी मतदान असून देखील खानदेशातील मोठा असा असलेल्या संत सखाराम महाराज द्वीशताब्दी महोत्सव सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला. सकाळी धार्मिक कार्यक्रमात काकड आरती व भजन संपल्यानंतर दादा महाराज शिरवळकर यांच्या कृष्णा महाराज अरगडे व कोमलसिंग महाराज हेंदरुनकर यांच्या नेतृत्वात बोरी नदीपात्रातील गाथा मंडपात यासाठी संगीतमय गाथा पारायण शुभारंभ करण्यात आला. यावेळी तब्बल ३ हजार भाविक सहभागी झाले होते संत सखाराम महाराज वारकरी पाठशाळा व परिसरातील नामवंत वादक, गायकांच्या सहकार्याने  संगीतमय भक्तिमय वातावरणात पारायण संपन्न झाले. त्यानंतर108 कुंडी विष्णू पंचायतन महायज्ञ सुरुवात 7 वाजता यज्ञमंडपात देवता स्थापना करण्यात आली.

त्यानंतर प्रधान यज्ञाचार्य नाशिकचे खास गुरुजी हेमंत धर्माधिकारी व उपयज्ञाचार्य वेदमूर्ति केशव पुराणिक अमळनेर यांच्या नेतृत्वात १०८ कुंडी विष्णू पंचायतन याग शुभारंभ करण्यात आलायात अग्नि नारायणाचे आवाहन करत पारंपरिक पद्धतीने अग्नि प्रज्वलित करण्यात आला. हा याग दररोज सकाळी ७ ते ९ या काळात होणार आहे. यावेळी चतुर्वेद पारायण देखील आरंभ करण्यात पार पडले. यावेळी चार वेदशात्री चारही वेदांचे पठण करणार आहेत त्याचबरोबर भजन गाथा पारायण सुरू राहील.  त्यानंतर अन्नदान व प्रवचन असे कार्यक्रम पार पडले त्यात प्रथम सत्रात संत रामदास स्वामींचे वंशज गंगाधर स्वामी यांचे वंशज भूषणशास्त्री महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले. दुसर्‍या सत्रात इन्दौरी येथील त्रिपदी परिवाराचे प्रमुख संत श्री नाना महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. हजारो भाविकांच्या हरिपाठानंतर पंढरपूर येथील शिरवळकर फडाचे दादा महाराज शिरवळकर यांचे कीर्तन पार पडले.  

यासह जळगाव येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीतर्फे २५० जणांनीरक्तदान केले. दररोज रक्तदानातूनबाटल्या रक्त संकलित करण्यात येईल.त्यात वेगवेगळ्या पतपेढी रक्तदान करणार आहेत. कांताई नेत्रपेढीतर्फेअधिक ३०० लोकांची  मोफत नेत्रतपासणी करण्यात आली असून-नेत्र तपासणी दररोज करण्यात येणार आहे. त्यात मोतीबिंदू असलेल्या ५५ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

तर दिव्यांग व्यक्तींना अंधकाठ्या आधारकाठ्या वॊकर,कमोड खुर्च्या, व्हीलचेअर यांचे वितरण १५० वस्तु वितरित करण्यात आल्या.नदीपात्रातील  विठ्ठलमूर्ती व त्रिमूर्ती यांच्या मुर्त्या रात्रीच्या वेळी शोभा वाढवत असतात.

यासह महाअन्नदान यात भोजन कक्षात प्रसाद महणून १० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *