अमळनेर तालुक्यात जळगांव लोकसभा मतदार संघासाठी एकूण ५३.३५ टक्के मतदान…

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर तालुक्यात जळगांव लोकसभा मतदार संघासाठी एकूण ५३.३५ टक्के मतदान झाले सकाळी मतदार ऊत्साहात होते तप्त ऊन्हामूळे दूपारी २ ते ५ या वेळेत मतदान मंदावले होते ६ मतदान केंद्रात मतदान यंत्र खराब झाल्याने अर्धा तास मतदान ऊशिरा सूरू झाले त्यात जिएस विद्यालय तांबेपूरा राजवड नंदगांव ढेकू व गांधलीपूर भागातील मतदान केंद्रांचा समावेश आहे तहसिल केंद्राजवळ रा कॉ ऊमेदवाराचे प्रचार पत्रक मतदारांना दिल्यावरून २ जणांविरूध्द गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारी वरून गून्हा दाखल करण्यात आला. सर्वत्र मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली कुठेही अनूचित प्रकार घडला नाही.

तालूक्यातील अनेक मतदान केंद्रांवर  आदर्श व सखी मतदान केंद्रे  सजवण्यात आली होती रांगोळी काढण्यात आली ” मी कशाला आरशात पाहू ग , मी तर मतदार राणी ग”अशी श्लेागन लावण्यात आली होती.

महिला सखी मतदान केंद्रावर येणाऱ्या महिला मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जात होते अनेक केंद्रांवर तरुणांना सेल्फी चा मोह आवरता आला नाही.

अमळनेर येथे जी एस हायस्कूल १७८ क्रमांकाच्या  मतदान केंद्रावर माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील हे प्रथम क्रमांकाने मतदान करायला गेले असता मतदान सुरू होऊ शकले  नाही व्ही व्ही पॅट मशीन ची  पिन व्यवस्थित न लावल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या निदर्शनास आले देवरे यांनी जोडणी व्यवस्थित केल्याने  २० मिनिटे मतदान उशिरा सुरू झाले तशाच प्रकारची अडचण तांबेपुरा भागात , गांधलीपुरा येथील अनिल अंबर पाटील प्राथमिक विद्यालयात , राजवड , नंदगाव , ढेकू आदी केंद्रांवर  जोडणी नीट नसणे , उलट सुलट जोडणीचा प्रयत्न आदी  किरकोळ अडचणी आल्यामुळे मतदान सकाळी ७  वाजता सुरू होऊ शकले नाही  अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणी दूर केल्याने  अर्ध्या तासात सर्वत्र मतदान सुरू झाले.

उष्णतेची लाट पाहता सकाळी ८ वाजेपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती ग्रामीण भागात दुपारी १ वाजेनंतर गर्दी ओसरली होती शिरूड , जवखेडा ,पिंपळे , डांगरी , सात्री , गोवर्धन , कळमसरे आदी गावांना दुपारपर्यंत चांगलीच गर्दी होती  मात्र आर्डी आनोरे गावात मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता आनोऱ्याच्या ग्रामस्थांनी सकाळी एकजुटीने पाणी फौंडेशन च्या कामाला महत्व दिले व दुपारी संपूर्ण गाव वाजंत्री सह ३०० हून अधिक ग्रामस्थ एकत्र मतदानाला निघाले त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती  शहरात देखील   दुपारी मतदारांनी गर्दी केली ग्रामीण भागात सायंकाळी ५ नंतर गर्दी वाढली तर शहरात काही ठिकाणी मात्र ५ नंतर गर्दी ची अपेक्षा असतानाही मतदार दिसून येत नव्हते.

एकूण ५३.३५ टक्के मतदान

सकाळी ९ वाजे पर्यंत ७.८६ टक्के मतदान झाले तर ११ पर्यंत हा आकडा २०.१६ पर्यंत पोहचला  दूपारी ३ वाजेला मतदानाची टक्केवारी ४०.९१ पर्यंत पोहचली त्या नंतर मात्र मतदान संथ झाले होते सायंकाळी ५ वाजे अखेर १ लाख ४५ हजार ३३३ म्हणजे ४९.७७ टक्के मत नोंदविले गेले मतदार संघात एकूण ३२९ बूथ वरील २ लाख ९२ हजार ३७ मतदाना पैकी शेवटच्या १ तासात अंतिम आकडेवारीत अवघ्या ४ टक्कयाने वाढ झाली एकूण पूरूष मतदार८३ हजार २१२ तर महिला मतदार ७२ हजार ५७६ अशा एकूण १ लाख ५५ हजार ७८८ मतदारांनी मतदान केले मतदारांना अनेक सोई सुविधा व मतदान करण्याचे सोशल व ईतर प्रसार माद्यमातून आवाहन करूनही गेल्या वेळे पेक्षा मतदानाची टक्केवारी यावेळी घटली हे विशेष होय.

अनोरेकर ग्रामस्थांचे श्रमदान  नंतर एकाच वेळी सामूहिक मतदान

आधी केले श्रमदान  आता करू मतदान, मिलके बोलो एक साथ दूष्काळाशी दोन हात, आमच्या गावाचा एकच पक्ष आमच्या गावावर पाण्यावर लक्ष ,घोषणा देत अमळनेर तालूक्यातील अनोरे गावातील सूमारे ३५० ग्रामस्थांनी  पंस सदस्य भिकेश पाटील व माजी जि प सदस्य संदिप पाटील यांचे नेतृत्वात दू २ वा २० मिनटांनी एकसाथ मतदानाला गावातून निघाले या गावाने वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असून सर्व गावाने सकाळी श्रमदान करून मतदानाला निघाले विशेष म्हणजे एकही ग्रामस्थ सकाळपासून मतदानाला गेले नव्हते सर्व ग्रामस्थ वाजत गाजत सह कूटूंब मतदानाला मतदान केंद्रावर पोहेचले दू .२ वाजे पर्यंत मतदान केंद्रावर त्यामूळे शूकशूकाट होता.

सात्री येथे काही लोक ए सी सरकार मानत असल्याने ते जनगणना करण्यास नकार देतात त्या गावातील ४२ कुटुंबे अजूनही भारताचे नागरिकत्व पत्करायला तयार नाहीत मात्र मतदार म्हणून त्यांची नोंदणी झाली आहे त्यामुळे गावाच्या लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या जास्त दिसून येत असल्याचे माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी सांगितले 

३२३ मतदान बूथ वर प्रक्रीया पूर्ण…..

मतदार संघातील ३२३ मतदान बूथ साठी प्रांताधिकारी सिमा आहिरे तहसिलदार व ३२ झोनल अधिकारी यांचे  नेतृत्वात १२९२ कर्मचारी कार्यरत होते तर पो नि अनिल बडगूजर यांचे मार्गदशना खाली कायदा व सूव्यवस्था सांभाळणे कामी १४ पोलीस अधिकारी ३३८ पोलीस व १६० होमगार्ड कर्मचारी कार्यरत होते किरकोळ प्रकार वगळता कूठेही अनूचित प्रकार घडला नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *