अमळनेर (प्रतिनिधी) दारूच्या नशेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या दोघांनी पंपावरील दोघांच्या डोक्यात दगड व विटांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना २३ रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.
शिवशक्ती चौक तांबेपुरा येथील गजानन जगन्नाथ पाटील व तन्वीर रहेमतुलला पिंजारी हे गलवाडे रोड वरील प्रमुख पेट्रोल पमपावर दारूच्या नशेत पेट्रोल भरायला गेले असता त्यांनी कर्मचाऱ्याशी वाद घालणे सुरू केला असता भरत अग्रवाल व घनश्याम अग्रवाल हे त्यांना आवरायला गेले असता गजानन ने दगड उचलून घनश्याम च्या डोक्यात मारला तर तन्वीर ने भरत च्या डोक्यात विट मारून फेकली व जखमी केले भरत अग्रवाल च्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला 326 , 323, 504 , 506 , 510 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे करीत आहेत