आता फक्त दोनच दान लोकशाही करीता “मतदान” आणि पाण्याकरीता “श्रमदान”…..

आपल्या “मत” चे “दान” आहे लोकशाही ची “शान”.

अमळनेर विधानसभा मतदारसंघात डांगर गावी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व विधानपरिषदेचे आमदार स्मिताताई वाघ तसेच त्यांच्या कन्येसहं कार्यकर्त्यांनी मतदानाचा हक्क बजावला..

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील जी एस हायस्कुल येथे सकाळी मतदान केंद्रावर जाऊन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व त्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी केंद्रावरील ई व्ही एम मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे अर्धातास मतदान उशिराने सुरू झाले.
यावेळी तहसिलदार ज्योती देवरे यांनी केंद्रावर भेट देऊन तांत्रिक तपासणी कर्मचाऱ्यांकडून करून घेतली पुन्हा तेच मशिन सुरू करण्यात आले.
या दरम्यान अमळनेर तालूका मतदार संघात जळगाव लोकसभे साठी सकाळी ११ वाजेपर्यंत २०.१६ % मतदान झाले.असून एकूण ५८८७३ यात पूरूष ३५२५९ हजार तर महिला मतदार २३६१४ ईतक्या मतदारांनी मत नोंदविले आहे सर्वच मतदान केंद्रावर मतदार स्वयंस्फूर्तीन येत होते सकाळ पासूनच मतदारांचा चांगला ऊत्साह एकूण २ लाख ९२ हजार ३७ मतदार आहेत.

मी मतदानाचा हक्क बजावला… आपणही मतदान करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *