खळ्यासह चा-याची राख ; लाखो रूपयांचे नुकसान

रत्नापिंप्री ता.पारोळा येथिल होळपिंप्री भागातील खळवाळीस भिषण आग लागल्याची घटना दि.२२ एप्रिल रोजी दुपारी ३:४५ वाजता घडली या घटनेतील जागेत होळपिंप्री, रत्नापिंप्री येथिल तीस ते पस्तीस शेतक-यांच्या गु-हेढोरे बांधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी सर्व शेतक-यांचे शेतीचे पुर्ण अवजारे ,चारा , बैलगाडी,तसेच गु-हेढोरे सर्व याठिकाणी होते या अचानक लागलेल्या आगीत पुर्णपणे जळून खाक झाले आहेत यात शेतक-यांचे लाखो रूपयांचे नुकसान ही झाले आहे आज दुपारी अचानक आग लागल्याचे कळताच रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री येथिल ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली तरूणांनी आग विझविण्यासाठी खुपच परीश्रम घेतले आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात आल्यावर पारोळा व अमळनेर येथिल अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले यावेळी दोंन्ही तालुक्यातील अग्निशमन दलाचे व्यक्तींनी आग विझविण्यास यश आले यावेळी गृप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश पाटील, विजय पाटील रत्नापिंप्री पोलिस पाटील प्रभाकर पाटील, होळपिंप्री पोलिस पाटील गौतम भालेराव ,दबापिंप्रीचे पोलिस पाटील प्रकाश भागवत, पत्रकार रामचंद्र पाटील,आदींनी वरीष्टांना आगीची सुचना करून अग्निशमन दलाला बोलविले तर रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री ग्रामस्थांनी, तरूनांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले या आगीच्या दुर्दैवाने जिवित हानी झाली नसली तरी शेतक-यांच्या सारा शेतीचा संसार जळून खाक झाला आहे.
रत्नापिंप्री ता.पारोळा येथिल होळपिंप्री भागातील खळवाळीस भिषण आग लागल्याची घटना दि.२२ एप्रिल रोजी दुपारी ३:४५ वाजता घडली या घटनेतील जागेत होळपिंप्री, रत्नापिंप्री येथिल तीस ते पस्तीस शेतक-यांच्या गु-हेढोरे बांधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी सर्व शेतक-यांचे शेतीचे पुर्ण अवजारे ,चारा , बैलगाडी,तसेच गु-हेढोरे सर्व याठिकाणी होते या अचानक लागलेल्या आगीत पुर्णपणे जळून खाक झाले आहेत यात शेतक-यांचे लाखो रूपयांचे नुकसान ही झाले आहे आज दुपारी अचानक आग लागल्याचे कळताच रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री येथिल ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली तरूणांनी आग विझविण्यासाठी खुपच परीश्रम घेतले आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात आल्यावर पारोळा व अमळनेर येथिल अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले यावेळी दोंन्ही तालुक्यातील अग्निशमन दलाचे व्यक्तींनी आग विझविण्यास यश आले यावेळी गृप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश पाटील, विजय पाटील रत्नापिंप्री पोलिस पाटील प्रभाकर पाटील, होळपिंप्री पोलिस पाटील गौतम भालेराव ,दबापिंप्रीचे पोलिस पाटील प्रकाश भागवत, पत्रकार रामचंद्र पाटील,आदींनी वरीष्टांना आगीची सुचना करून अग्निशमन दलाला बोलविले तर रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री ग्रामस्थांनी, तरूनांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले या आगीच्या दुर्दैवाने जिवित हानी झाली नसली तरी शेतक-यांच्या सारा शेतीचा संसार जळून खाक झाला आहे
मतदान केंद्राच्या भिंती जवळच आग
रत्नापिंप्री येथिल मतदान केंद्र क्रमांक २७२ याच अंगणवाडी च्या भिंतीला लागूनच असलेल्या या खळवाडीस आग लागली मतदान केंद्रात नुकसान झाले नसले तरी या ईमारतीची भिंत पुर्ण पणे गरम झाली होती.