भाजपा जिल्ह्याध्यक्ष उदय वाघ यांनी घेतला पुढाकार,समाज बांधवात कौतुक
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीतही प्रचंड उधळपट्टी करून थाटामाटात विवाह होत असताना तालुक्यातील दहिवद येथील मराठा समाजातील एका उच्चशिक्षित जोडप्याचा साखरपुड्यापातच आदर्श विवाह पार पडला. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष उदय वाघ यांनी पुढाकार घेऊन हा आदर्श विवाह घडवून आणला.
अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका श्रीमती मंगलाबाई किशोर पाटील यांचा भाचा कै संतोष भीमराव पाटील यांचे चिरंजीव व गणेश विष्णू पाटील यांचे पुतणे दीपक संतोष पाटील याचा विवाह अमळनेर तालुक्यातीलच दहिवद येथील शामकांत नारायण पवार यांची सुपुत्री चि सौ का निकिता सोबत निश्चित झाला होता,वर दीपक हा उच्चशिक्षित असून तो नाशिक येथे कॉन्ट्रॅक्टर आहे,तर वधु निकिता हिचे शिक्षण बीएस्सी पर्यंत झाले आहे,दोन्ही उच्चशिक्षित असल्याने त्यांच्यात विवाहाचा योग घडून आला,यापार्श्वभूमीवर दहिवद येथे दि २२ एप्रिल रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता,या कार्यक्रमात सर्व नातलग व समाज बांधव उपस्थित असताना जिल्ह्याध्यक्ष उदय वाघ यांनी याच कार्यक्रमात विवाह उरकवून आदर्श घडविण्याची संकल्पना मांडली,यास दोन्ही बाजूच्या मंडळींनी त्वरित सहमती दर्शविली,विशेष म्हणजे शैक्षनामुळे आधुनिक विचार सरणी असलेल्या वधु वरांनी देखील तयारी दाखविल्याने लागलीच विवाहाची तयारी करण्यात येऊन अतिशय साधेपणाने हा विवाह उरकण्यात आला.उदय वाघ यांनी दोन्ही कडील मंडळींचे विशेष असे कौतुक करून मराठा समाजाने यांचा आदर्श घेत विवाह समारंभात होणारा वायफळ खर्च,अनिष्ट रूढी व परंपरा यांना फाटा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी माजी जि प सदस्य ए टी पाटील,गणेश पाटील,राहुल पाटील,सावंन पाटील व मान्यवर उपस्थित होते.