सत्ताधाऱ्यांनो मुस्कटदाबीला भीक घालणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे “ट्विट” जनतेची दिशाभूल करणारे…

सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे जाहीर निषेध.पाडळसे धरण पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन तिव्र करत राहू.!

मुख्यमंत्री ????यांचे ट्विट

अमळनेर (प्रतिनिधी) येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे धरणाच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या निदर्शनानंतर मुख्यमंत्री यांनी पाडळसरे धरण आम्हीच पूर्ण करू!असे जाहीर आश्वासन भाषणात दिले ,ट्विटरवर काम पूर्ण गतीने सुरू असल्याचे लिहिले.दुसरीकडे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी पोलिस प्रशासनाने राजकिय दबावात आंदोलकांवर ज्यादा कलम लावून गुन्हे दाखल केले असल्याचे कळताच,
‘एकीकडे धरणाबद्दल कळवळा दाखवायचा दुसरीकडे जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे अश्या सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणाचा जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे.
‘लोकसभा निवडणुकीत पाडळसरे धरणाचा प्रश्न मुख्यमंत्री यांच्यासह राज्याच्या सत्ताधारी नेत्यांना अडचणींचा ठरत आहे. भविष्यात पुन्हा संघर्ष समितीने तोंड वर काढू नये म्हणून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न राजकिय दबावात प्रशासनाने चालविला असून समिती अश्या मुस्कटदाबीला भीक घालणार नाही! धरण पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन तिव्र करत राहू!’ अशी प्रतिक्रिया जनआंदोलन समितिचे सुभाष चौधरी , प्रा.शिवाजीराव पाटिल यांनी दिली आहे. मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात धरणाच्या प्रश्नाबाबत जनआंदोलन समितीला निवेदन देण्यापासून रोखण्यात आले होते.म्हणून समितीने सहा तालुक्यातील जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर निदर्शने केलीत.तात्काळ दुपारी समितीच्या आंदोलकांना कलम ६८ प्रमाणे अटक करण्यात आली तर कलम ६९प्रमाणे सायंकाळी सोडण्यात आले होते. जनआंदोलनाच्या निदर्शनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना धरणाची दखल घ्यावी लागली ‘पाडळसरे धरण आम्हीच पूर्ण करू!जलसंपदा मंत्री गिरिषभाऊ यांचेवर धरणाची जबाबदारी टाकली आहे!’असे सांगितले तर स्वतः संध्याकाळी ट्विटरवर ट्विट करून “आम्ही पाडळसे डॅम चे कामासाठी 2771 कोटी मंजूर केले आहे.धरणाचे काम पूर्ण गतिमानतेने, (जोरात)सुरू आहे.सदर प्रकल्पाने या तालुक्यातील ६७ गावांना लाभ मिळेल !”असे जाहिर केले.वस्तुस्थिती मात्र वेगळी असून धरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून सदर ट्विट हे जनतेची दिशाभूल करणारे आहे.असेही समितीने म्हटले आहे.एकीकडे धरणाबद्दल कळवळा दाखवायचा दुसरीकडे जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे असे दुटप्पी धोरण शासन राबवित आहे.शासनाच्या दुटप्पीपणा चा जाहीर निषेध समिती करीत असून भविष्यात जनआंदोलन समिती धरणासाठीचा संघर्ष अधिक तिव्र करेल !असा इशाराही पाडळसरे धरण संघर्ष समितीने दिला आहे.
तर जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणाऱ्या समिती कार्यकर्त्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत! असे जाहिर आवाहन पत्रकाद्वारे समितीतर्फे देविदास देसले रणजित शिंदे यांनी केले आहे.

Tags: 679767976797679767976797679767976797679767976797679767976797679767976797679767976797679767976797

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *