अमळनेर (प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी २ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत यापूर्वी २ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी डी वाय एस पी यांच्या मार्फत शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना लोकसभा निवडणूक काळात हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६( १)ब अन्वये उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांच्याकडे पाठवला होता त्यावर सुनावणी होऊन संबंधित व्यक्तींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली ७ पैकी ३ जणांचे हद्दपारी प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत गांधलीपुरा परिसरातील राफीयोद्दीन सिराजोद्दीन शेख याच्यावर मारामारी करणे ,दरोडा, विनयभंग , सरकारी कामात अडथळा आणणे, मुंबई जुगार कायदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून दंगा करणे , शहरात दादागिरीने पैसे मागणे , मारामारी करणे , लूटमार करणे असे आरोप असल्याने आणि दीपक रावा पाटील रा बोरसे गल्ली याच्यावर चोरी व घरफोडीचे सात गुन्हे दाखल असून गुजरात येथे देखील खून व लुटमारीचा गुन्हा दाखल आहे तो देखील शहरात मारामारी , जबरदस्तीने पैसे मागणे असे गुन्हे करत असल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला होता त्यानुसार प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी रफीख शेख यास चार महिने व दीपक पाटील याला तीन महिन्यांसाठी आदेश मिळाल्यापासून दोन दिवसात जळगाव जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार केले असून ते ज्याठिकाणी राहतील तेथील नजीकच्या पोलीस स्टेशनला दर महिन्याला हजेरी लावायची असून महाराष्ट्र राज्याबाहेर जायचे असेल तर त्याबाबत आधी अमळनेर पोलीस स्टेशनला कळविण्याचे आदेशात म्हटले आहे.