अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथील एका ३२ वर्षीय आदिवासी महिलेवर पती सप्तश्रृंगी गडावर गेले असतांना घरात एकटी पाहून १७ एप्रिल रोजी रात्री उकाडा होत असल्याने घराचा दरवाजा उघडा पाहून व घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन रात्रीचे ११ ते ११:३० दरम्यान वावडे गावातीलच आप्पा संतोष भिल्ल वय ३१ याने घरात घुसून एकटी महिला पाहून मारहाण करून जबरीने तिच्यावर बलात्कार केला व कोना कडे वाच्यता केल्यास जीवे मारून टाकेन म्हणून धमकी देऊन पळून गेला अशी फिर्याद काल २० रोजी मारवड पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी आप्पा संतोष भिल्ल वय ३१ याचे विरोधात बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित महिलेला रात्रीच उशिरा अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता पाठविण्यात आले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत अटकेची कार्यवाही करण्यात आली, या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेमळे हे करीत आहेत.
तक्रार घेण्यास व माहिती देण्यास पोलीसाकडून टाळाटाळ
तक्रारदार महिला व पती दुपार पासून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्या अअअअसाठी येऊन बसले होते,मात्र मारवड पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारीच नसल्याने पीडित महिलेचा जबाब नोंदविण्यासाठी पारोळा या बाहेरच्या तालुक्यातून महिला अधिकारी बोलविण्यात आल्यावर रात्री ७ वाजता पारोळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे या आल्यावर जबाब नोंदवून रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला,मात्र तक्रारदार महिलेचे पती यांनी पत्रकारांना सांगितले कि आम्ही १८ तारखेला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आलो होतो मात्र पोलीस मुख्यमंत्री दौऱ्यामुळे व्यस्त असल्याने तक्रार घेतली गेली नाही व आज आदिवासी संघटनेचे बापू कोळी व आर पी आय महिला पदाधिकारी आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असे तक्रारदार महिलेचे पतीने रात्री पोलीस ठाण्यात पत्रकारांना सांगितले, या बाबत गुन्ह्या दाखल होऊन हि रात्री उशिरापर्यंत पत्रकार पोलीस ठाण्यात माहितीकरीता बसले होते, गुन्हा रात्री ८;२९ ला दाखल झाला तरी ९ वाजेपर्यंत ठाणेदार व पोलीस उपनिरीक्षक यांच्या कडून पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली, शेवटी पोलीस ठाण्याचे प्रभारी समाधान पाटील यांनी रात्री ९:२५ वाजता प्रेसनोट जारी केल्यावर माहिती भेटली.