अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर ढेकूरोड वर लामा जीन समोर रस्त्यावर मोटरसायकल व पॅजो मालवाहतूक रिक्षा यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला आहे अपघात इतका भीषण होता की मोटारसायकल स्वार रस्त्यावर धडकेत आपटून ठार झाला आहे.
रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अमळनेर कडून प्रवीण पंढरीनाथ पाटील रा ढेकू अंबासन हा मोटारसायकल क्र एम एच 19 ए सी 8819 काळ्या रंगाची हिरो होंडाने जात असताना ढेकूसीम कडून येणाऱ्या पॅजो रिक्षा क्र एम एच 15 आर 5329 या पॅजो रिक्षाची समोरासमोर धडक दिली यात प्रवीण पंढरीनाथ पाटील हा जागीच ठार झाला असून त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.