
शुक्रवारी रात्री भुसावळात अमळनेरचा अनेक गुन्ह्यात हवा असलेला फरार आरोपी कुख्यात आरोपी राकेश चव्हाण गावठी पिस्तुल व काडतुसांसह जेरबंद
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील कुख्यात आरोपी राकेश चव्हाण यास भुसावळ पोलिसांची गस्त सुरू असताना संशयितरित्या फिरत असतांना आढळून आला असून त्याला जेरबंद केले असल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
रविवारी रात्री सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पो.ना.सुनिल थोरात, दिपक जाधव, नरेंद्र चौधरी, पो.काँ कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, राहुल चौधरी, बापुराव बडगुजर असे सर्व जण भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्त करत असतांना भुसावळ शहर पो.स्टे ला भाग 5 गु.र.न 92/2019 भा.द.वि कलम 302 मधील फरार आरोपी विनोद लक्ष्मण चावरीया रा.वाल्मीक नगर व नंदुरबार लोहमार्ग पो.स्टे ला भाग 5 गु.र.न 288/2018 भा.द.वि कलम 307,353,आर्म अँक्ट 3/25 व अमळनेर पो.स्टे ला विविध गुन्हयातील फरार आरोपी राकेश वसंत चव्हाण रा. अमळनेर हे दोघे जण भुसावळ शहरात घरफोडी व चोरी करण्याच्या इरादयाने शहरात आले असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने मा.पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले जळगाव भाग पोलीस उपअधिक्षक लोहीत मतानी भुसावळ भाग डीवायएसपी गजानन राठोड व भुसावळ बाजार पेठ पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व पोलीस कर्मचारी भुसावळ बाजार पेठ पो.स्टे हद्दीतील आरोपींचा शोध घेवु लागले तेव्हा रविवारी पहाटे 03:30 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात पंढरीनाथ नगर भागात दोन इसम हे संशयीतपणे जातांना दिसले त्यांना कोण आहे थांबा म्हणताच ते पोलीसांना पाहुन पळु लागले वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ला ओळखले त्यात तो विनोद चावरीया होता त्यास विनोद थांब पळु नको अशा आरोळ्या मारुन त्याच्या मागे पो.काँ उमाकांत पाटील, राहुल चौधरी अश्यांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो गल्ली बोळाचा फायदा घेवुन पळुन गेला तो मिळुन आला नाही तसेच दुसरा झसम याच्या मागे पो.ना.दिपक जाधव पो.काँ कृष्णा देशमुख अश्यांनी पाठलाग करीत असतांना तो इसम पळतांना दोन ठिकानी पडला त्याने उठुन त्याच्या जवळ असलेला गावठी रिवाल्वर पो.काँ कृष्णा देशमुख यांच्या कडे करुन रुक जावो नही तो मे तुम्हें जान से मार डालुगां अशी धमकी दिली तेव्हा वरील पो.कर्मचारी याने बळाचा वापर करुन त्यास ताब्यात घेतले तेव्हा त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राकेश वसंत चव्हाण वय-30 रा.बंगाली फाईल प्रताप काँलेज जवळ अमळनेर असे सांगितले त्याच्या जवळ
1) 5000/- रु.कि.चा एक गावठी कट्टा
2) 1000/- रु.कि.चे दोन जिवंत गावठी काडतुसे मिळाले.