अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील भाजप ,शिवसेना रासप, रिपाई च्या संयुक्त मेळाव्यात झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या सह सातही आरोपींवर सी.आर.पी.सी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अहवाल कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केला आहे.
कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे यांनी सातही आरोपीना नोटीस देऊन त्यात म्हटले आहे की सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये , निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जनक्षोभ वाढू नये म्हणून आपणास ही नोटीस काढण्यात येत आहे त्यामुळे सहा महिने मुदतीचा व ५० हजार रुपये किमतीच्या जातमुचलक्याचा व दोन प्रतिष्ठित व्यक्तींचा जामीन घेऊन कार्यकारी दंडाधिकारीच्या न्यायालयात हजर राहण्याचे सूचित केले आहे.