सन्मानीय अधिकाऱ्यांनो तुमची पोकळ धतींगशाही थांबवा….

कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्या चा जीव जाय..
निवडणूक व्यवस्थेला सुतक नाय.!

अनाहूत नम्र पत्र

महाशय जिल्हाधिकारी सो तथा निवडणूक निर्णय अधिकारी,जळगांव

महोदय….

चोपड्या तालुक्यातील तावसे येथील मूळ रहिवासी आणि अमळनेर कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अंबादास बळीराम चौधरी (ह.भ.प महाराज) वय ५३ यांचा दिनांक १३/ ४ /२०१९ रोजी निवडणूक प्रशिक्षण कामी गेले असता दुपारी ४
वाजेच्या सुमारास चाळीसगांव बस स्थानक समोरच चक्कर येऊन डोक्यावर पडल्यामुळे रक्तबंबाळ झाले होते.त्या शिक्षकास तात्काळ शिक्षकांनी व इतर नागरिकांनी तेथील समर्थ हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यावेळी डॉक्टरांनी मुत्यु घोषित केले.
मात्र तेथे निवडणूक व्यवस्थापनेतील अधिकारी,कर्मचारी पोहचले नाहीत ही शोकांतीका आहे.
अमळनेर चे रहिवाशी अंबदास चौधरी एकाकएकी जीवन यात्रा संपवतात पूर्ण निवडणूक व्यवस्थापनच्या दबावाने अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावे लागेल..?
दुर्दैवाने हा मृत्यू झाला तो कसा झाला काय झाला ते वैद्यकीय अहवालातून समेजलच यावर अधिक बोलणं चुकीचं ठरेल.
या निवडणुकी दरम्यान प्रथम प्रशिक्षण वर्ग स्थानिक तालुक्याठिकाणी घेतले जाते द्वितीय प्रशिक्षण वर्ग नेमणुकीच्या तालुक्यात आयोजित केले जाते या मध्ये अमळनेरचा कर्मचारी चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, आदी ठिकाणी नेमणुकीस दर्शवून वेळेचा, व प्रवासाचा अदमास न घेता वेळेची मर्यादा घातली जाते. या साठी राष्ट्रीय कार्याचे मौलिक उदाहरण देऊन कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव वाढवला जातो या साऱ्यापरिस्थितीचा परिणाम वयस्क कर्मचाऱ्याचा दुर्दैव असावं याचेच ज्वलंत उदाहरण अंबादास चौधरी आहे. अमळनेर तालुक्यातील यांचे प्रथम प्रशिक्षण अमळनेरनंतर त्यांना द्वितीय प्रशिक्षणास चाळीसगांव येथे रुजू राहण्याचे आदेश देऊन त्यांचा वेळ त्यांची मानसिक स्थिती लक्षात न घेता त्यांच्या वयास न पेलवणारी धावपळ त्यांना राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली दबाव युक्त तंत्राने लादण्यात आले परिणाम स्वरूप उन्हा-तान्हाची पर्वा न करता वेळेचं बंधन पाळण्यासाठी धावपळ करत चाळीसगांव येथे पोहचले उष्मघाताचा प्रघात आयुष्य संपवून गेलं त्यांच्या कुटुंबाचे काय..? अजून निवडणुकी दरम्यान जळगांव जिल्ह्यात किती जणांचा मुत्यु झाला आहे याचा ही शोध घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय कार्यात सहभागी होणासाठी त्यांची धावपळ शहीद ठरवू शकते का..? त्यांच्या कुटुंबियांना निवडणूक आयोग मदत निधी जाहीर करू शकते का..? कारण निवडणुकी संदर्भात केलेला खर्चाचे कुठलेही ऑडीट (हिशोब तपासणी) होत नसते मग राष्ट्रीय कार्यासाठी अश्या अनाहूत आणि कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कोणत्या वर्गात समाविष्ठ करून काय मदत देऊ शकते..?
महोदय….वास्तविक प्रथम आणि द्वितीय प्रशिक्षण निवासी तालुक्यात देऊन निवडणुकीच्या पूर्वसंध्येला साहित्य वितरणाचा वर्ग हा दिलेल्या तालुक्यात घेतला असता तर कार्यात हेडसांड आणि उष्माघाताचा प्रकोप सहन करावा लागला नसता आणि जीवानीशी राजकीय व्यवस्था स्थापणेसाठी बळी गेला नसता. तरी या सर्व मुद्यावर गांभीर्याने विचार व्हावा. टीका टिपण्णी करणे हा माझा व्यवसाय नाही. परंतु एक कर्तव्य तत्पर कर्मचारी गेल्याचे मात्र दुःख आहे. त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबाचा आधारवड कोसळल्याची हानी कोण भरून काढेल ह्या विवंचनेत हे पत्र प्रपंच.!

कृपया भावना समजून घ्याव्यात अर्थाचा अनर्थ करू नये.

त्यांच्या पश्चात पत्नी ,एक १ मुलगा १ मुलगी ,वडिल , असा परिवार आहे.
त्यांचा स्वभाव मितभाषी,प्रामाणिक होता ते कामात एकनिष्ठ ,कर्तव्यदक्ष होते. ते संत सखाराम महाराज संस्थानात सदस्य होते तसेच गजानन महाराज संस्थान येथे दरवर्षी किर्तन प्रवचनाचा कार्यक्रम घ्यायचे त्यांच्या निधनाने अमळनेर व कळमसरे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *